शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
2
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
3
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
4
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
5
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
6
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
7
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
8
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
9
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
10
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

काँक्रिटीकरण मार्गी लावा

By admin | Published: May 16, 2016 2:54 AM

खड्डे बुजवण्याचे काम महापालिकेने न करता संबंधित कंत्राटदाराकडूनच करून घ्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे केली

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे संथ गतीने सुरू आहेत. पावसाळा नजीक आल्याने ही कामे तातडीने मार्गी लावा, तसेच पावसाळ्याच्या धर्तीवर अशा कामांच्या ठिकाणचे खड्डे बुजवण्याचे काम महापालिकेने न करता संबंधित कंत्राटदाराकडूनच करून घ्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे केली आहे.विविध प्रभागांमध्ये सुरू असलेली काँक्रिटीकरणाची कामे पाहता तेथील परिस्थिती चिंताजनक आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. मात्र, विविध कंपन्यांच्या केबल, विजेचे खांब हलवण्याची कार्यवाही अजूनही पूर्ण झालेली नाही. या रस्त्यांच्या शेजारील पदपथांखालील गटारांची कामे आणि पदपथांची कामेही अतिशय संथ गतीने सुरू आहेत. काही ठिकाणी लाद्या बसवलेल्या नाहीत. ही कामे २०-२२ दिवसांत पूर्ण होणे शक्य नसल्याकडे भोईर यांनी लक्ष वेधले आहे. पावसाळ्यात कोणतीही गंभीर समस्या उद्भवू नये, यासाठी काँक्रिटीकरणाच्या ठिकाणी खोदलेले खड्डे संबंधित कंत्राटदाराकडूनच भरून घ्यावेत. त्यासाठी महापालिकेने वेगळा खर्च करू नये, अशी विनंती भोईर यांनी रवींद्रन यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. (प्रतिनिधी)