वसई : वसई-विरारसह गुजरातमध्ये घरफोड्या करणाऱ्या नेपाळी गँगच्या दोघांना माणिकपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून यातील एक आरोपी फरार झाला आहे. आरोपींकडून पोलिसांनी लाखोंचा ऐवज जप्त केला आहे. वॉचमनची नोकरी करणारे नेपाळी घरफोड्या करीत असल्याचे उजेडात आले आहे. माणिकपूर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी पेट्रोलिंंग करीत असताना तीन इसम संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आल्यानंतर चौकशी केली असता त्यातील एक जण पसार झाला. दोघांना त्याब्यात घेतल्यानंतर ही टोळी घरफोडी करण्यासाठी जात असल्याचे तपासात उजेडात आले. धर्मराज दाराम शर्मा (३५) आणि प्रकाश पम गिरी (३५) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील धर्मराज सह्याद्री सोसायटीत वॉचमनचे काम करीत असल्याचे उजेडात आले आहे. वॉचमनसाठी असलेल्या घराची झडती घेतली असता एका बॅगेत ११ लाख ५८ हजार ४०० किंमतीचे सोने-हिऱ्याचे दागिने, ८७ हजार ६४० हजार रोख रक्कम, ९० हजारांचे मोबाइल, लॅपटॉप असा माल जप्त करण्यात आला.या टोळीने माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी तसेच गुजरातमधील सुरत येथे एक अशा चार घरफोड्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली.
घरफोड्या करणारी नेपाळी टोळी अटकेत
By admin | Published: June 11, 2016 3:37 AM