ऑनलाइन लोकमतडोंबिवली, दि. 16 - नागरिकांच्या हक्कासाठी फेरीवालेमुक्त, खड्डेमुक्त आणि अडथळामुक्त फूटपाथ, पादचाऱ्यांना सोईस्कर फूटपाथ मिळण्यासाठी मानवी साखळीतून महापालिकेचा निषेध करण्यासाठी मंगळवारी डोंबिवलीकर एकत्र येण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने उपक्रमाची बांधणी करण्याचे काम वेगाने सुरू आहे.सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि ज्यांना स्वच्छ, सुबक, खड्डेमुक्त डोंबिवली हवी आहे त्यांनी सहभाग घ्यावा. आपले बदनाम शहर सुधारण्यासाठी ही सुरुवात आहे, लवकरच कल्याण-डोंबिवली सुधार मंच स्थापन करून महानगरपालिकेच्या नाकीनऊ आणण्यासाठी कायदेशीर मार्गाने लढा देण्यासाठी एकत्र या, आपला नागरी हक्क आणि नागरिकांची सनदेची ठोस अंमलबजावणी करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन दक्ष नागरिकांनी केले आहे.
मानवी साखळीद्वारे मंगळवारी फेरीवाल्यांना होणार विरोध
By admin | Published: July 16, 2017 11:00 AM