शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

संघटनांमधील वाद धुमसतोय

By admin | Published: February 28, 2017 1:18 AM

दोन संघटनांमध्ये निर्माण झालेल्या वादाचे पडसात सोमवारीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उमटलेले दिसून आले.

पुणे : आक्षेपार्ह पोस्टर लावल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)आणि स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) या दोन संघटनांमध्ये निर्माण झालेल्या वादाचे पडसात सोमवारीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उमटलेले दिसून आले. एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे विद्यापीठात रॅली काढण्यास परवानगी मागितली. मात्र, पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठाच्या आवारात अभाविप आणि एसएफआय या दोन संघटनांमध्ये वाद सुरू आहे. दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले; मात्र विद्यापीठाच्या आवारात दडपशाही केली जात असल्याचा आरोप करीत त्याच्या निषेधार्थ एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढण्याची भूमिका घेतली. परंतु, पोलिसांकडून मोर्चास परवानगी न दिल्याने पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काही काळ वाद झाला. त्यानंतर एकाच ठिकाणी बसून विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून निषेध नोंदवला. सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत विद्यापीठात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.विद्यापीठात जमावबंदी लागू करण्यात आली असल्याचे सांगून पोलिसांकडून रॅली काढण्यास परवानगी दिली जात नाही. मात्र, अभाविपला शनिवारवाड्यापासून कौन्सिल हॉलपर्यंत मोर्चा काढण्यास परवानगी दिली जाते. पोलिसांकडून हा दुजाभाव दाखवला जात असल्याचा आरोपही एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी केला.एसएफआय संघटनेस संभाजी ब्रिगेड, आयसा, डाप्सा, सम्यक् विद्यार्थी आंदोलन आदी संघटनांनी पाठिंबा दिला. सर्व संघटनांनी भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध केला.>पोलिसांवर राजकीय दबावविद्यापीठाच्या मुख्य द्वारापासून ते मुख्य इमारतीपर्यंत रॅली काढण्यासाठी मागच्या आठवड्यात पोलिसांची परवानगी घेतली होती, मात्र सोमवारी सकाळी ११ वाजता अचानक परवानगी नाकारण्यात आली.राजकीय दबावातून ही परवानगी नाकारली जात असल्याचा आरोप भूषण राऊत या विद्यार्थ्याने केला.विद्यापीठातील अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून दडपशाही व दादागिरी करून विद्यार्थ्यांवर दबाव आणला जात असल्याचा अरोप विद्यार्थी एसएफआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. पोलिसांनी व विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठात निर्भीड वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी केली.>सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चर्चा होण्यास हरकत नसली तरी चर्चा या संविधानाच्या कक्षेत राहूनच व्हायला हव्यात. विद्यार्थ्यांच्या चर्चा या वैचारिक पातळीवरच झाल्या पाहिजेत. विद्यापीठातर्फे कुठल्याही प्रकारच्या हिंसक घटनांचे समर्थन केले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी समजूतदारपणा दाखवणे गरजेचे आहे. कोणत्याही घटनांमुळे विद्यापीठातील वातावरण दूषित होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. तरीही अशा बाबी समोर आल्या तर विद्यापीठ प्रशासनातर्फे संबंधितांवर योग्य कारवाई केली जाईल.- वासुदेव गाडे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ >विद्यापीठातील विचार स्वातंत्र्य नष्ट होत चालले असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘सावित्री’ची लेक म्हणून बोलायला उभी असताना आज भीती वाटत आहे. आम्हाला दुसऱ्यांकडून देशभक्ती शिकवली जाते. मात्र, आम्ही कोणाला घाबरणार नाही. आम्ही वैचारिक स्वातंत्र्यासाठी उभे राहून लढा उभारू. शांततेच्या मार्गाने लोकशाहीसाठी आम्ही झगडत राहू.- एस. जी. राही, विद्यार्थी