मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेली लंडनमधील वास्तू विकत घेतल्यानंतर त्यावर मालकी कोणाची? केंद्र सरकार की राज्य सरकारची, असा पेच निर्माण झाला असून, यावरून मंत्रिमंडळ बैठकीत मतभेदांचे सूर उमटले.वास्तू खरेदीचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने आणला असल्यामुळे त्यांनीच ते खरेदी करावे, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. तर देशातील एखाद्या राज्याने विदेशात स्वत:च थेट खरेदी करण्याची पद्धत नाही. तसे असते तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा कोणत्याही राज्याने विदेशात अशी खरेदी केली असती, असे मत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडले. वास्तू खरेदी करण्याची प्रक्रिया येत्या ४ सप्टेंबर रोजी पूर्ण होणार असून त्यावर राज्य सरकारचीच मालकी असेल, असा दावा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केला. वास्तू खरेदी करण्यास मुख्यमंत्र्यांनीही संमती दिल्याचे समजते. (विशेष प्रतिनिधी)
लंडनमधील वास्तूवरून मंत्रिमंडळात मतभेद
By admin | Published: August 26, 2015 5:13 AM