शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

दादरच्या बालेकिल्ल्यात प्रतिष्ठेचा 'सामना'

By admin | Published: February 07, 2017 12:03 PM

मुंबई महापालिका निवडणुकीत काही मतदारसंघांमधील लढती राजकीय पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या असणार आहेत. इथे विजय मिळवण्यासाठी राजकीय पक्ष आपली शक्ती पणाला लावत आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 7 - मुंबई महापालिका निवडणुकीत काही मतदारसंघांमधील लढती राजकीय पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या असणार आहेत. इथे विजय मिळवण्यासाठी राजकीय पक्ष आपली शक्ती पणाला लावत आहेत. अशा मतदारसंघांपैकी एक आहे दादरचा वॉर्ड नंबर 191. शिवसेनेचे मुख्यालय शिवसेना भवन तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान या मतदारसंघात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांसाठी या मतदारसंघात जय-पराजय प्रतिष्ठेचा असणार आहे. 
 
2008 पर्यंत हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला होता. पण 2009 विधानसभा निवडणुकीत मनसेचे नितीन सरदेसाई इथून आमदार झाले आणि त्यानंतर चित्रच बदलून गेले. 2012 मध्ये मनसेने येथे क्लीनस्वीप करताना नगरसेवकपदाच्या सर्वच्या सर्व सात मतदारसंघांमध्ये विजय मिळवला. पण 2014 मध्ये पुन्हा इथून शिवसेनेचे सदा सरवणकर आमदार म्हणून विजयी झाले. त्यामुळे यावेळी या विभागात दोन्ही पक्षांमध्ये 'काटें की टक्कर' आहे. त्यात 191 वॉर्ड दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेचा आहे. 
 
शिवसेनेने इथे बाजी मारण्यासाठी माजी महापौर विशाखा राऊत यांना रिंगणात उतरवले आहे. मनसेकडून स्वप्ना देशपांडे रिंगणात आहेत. त्या विद्यमान नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या पत्नी आहेत. हा मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाला आहे. निवडणूक लढवण्यासाठी स्वप्ना देशपांडे यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे. भाजपाकडून डॉ. तेजस्वीनी जाधव रिंगणात आहेत. 
मराठीबहुल या भागामध्ये शिवाजीपार्क, शिवसेना भवनचा परिसर येतो. 1966 साली शिवसेनेची स्थापना झाल्यापासून इथे शिवसेनेचे वर्चस्व होते. पण 2009 पासून शिवसेनेच्या या गडाला खिंडार पडले. शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा हा मतदारसंघ आहे.