पुणे : पुणे मेट्रोला दिल्लीच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाकडून (पीआयबी) मान्यता मिळणार तरी कधी याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पीआयबीच्या संकेतस्थळावर विविध प्रकल्पांबाबत काय निर्णय घ्यायचे याचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. त्यात ६ आॅक्टोबर ही शिफारस करण्याची अंतिम तारीख देण्यात आली आहे. त्याच वेळी बैठक होईल अशी चर्चा आहे. मात्र आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह पालिका प्रशासनातील कोणालाच याबाबत माहिती नाही.बैठक नाही असे आयुक्तांनी सांगितले तर या प्रकल्पाचे महापालिकेतील काम पाहत असलेल्या प्रकल्प अभियंता यांनी बैठकीबाबत पीआयबीकडून अद्याप काहीही कळवले नसल्याचे स्पष्ट केले. पुणे मेट्रोच्या प्रकल्पाला आता राज्य व केंद्र सरकारच्या सर्व स्तरांवर मान्यता मिळालेली आहे. फक्त पीआयबीची मान्यता मिळणे बाकी आहे. त्याबाबतच संभ्रम निर्माण झाला आहे. ही मान्यता मिळण्यापूर्वीच मेट्रोसाठी साडेसहा हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. त्यावरून सध्या बरीच राजकीय टीकाटिप्पणी होत असून, त्यातच आता पीआयबीच्या मान्यतेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)>पीआयबीच्या संकेतस्थळावर मोठ्या प्रकल्पांबाबत निर्णयाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यात पीआयबी मेमो फॉर पुणे मेट्रो प्रोजेक्ट, फेज १ असे म्हटले असून, त्यात ८ सप्टेंबर २०१६ अशी तारीख देण्यात आली आहे. त्याच्याच पुढे डेट आॅफ इश्यू आॅफ अॅप्रायझल नोट असे नमूद करण्यात आले असून, त्यात ६ आॅक्टोबर २०१६ अशी तारीख आहे. त्यामुळे त्या दिवशीच बैठक होणार अशी चर्चा सुरू झाली आहे,
मेट्रोसाठी पीआयबी बैठकीबाबत संभ्रमच
By admin | Published: September 20, 2016 1:23 AM