शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

गुजरातला पाणी देण्यावरून गोंधळ

By admin | Published: April 10, 2015 4:12 AM

नार-पार-तापीचे पाणी गुजरातला देण्यावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ

मुंबई : नार-पार-तापीचे पाणी गुजरातला देण्यावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी हातात फलक घेऊन वेलमध्ये ठिय्या मांडल्याने एकच गोंधळ उडाला.प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच भुजबळ हातात फलक घेऊन वेलमध्ये उतरले. त्यांच्या या मौन सत्याग्रहात पंकज भुजबळ, दीपिका चव्हाण, जीवा पांडू गावित हेदेखील सहभागी झाले. प्रश्न मांडण्यासाठी संसदीय आयुधं अपुरी आहेत का, असा सवाल करीत भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ सदस्यांनी असे करणे योग्य नाही, असे मत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले; तेव्हा भुजबळांवर अशी वेळ का आली? असा प्रतिवाद दिलीप वळसे पाटील यांनी केला. त्यावर सभागृहात बॅनर घेऊन येणे प्रथा, परंपरेच्या विरोधात आहे असे आम्हाला माजी अध्यक्ष वळसे पाटील सांगत असत, असा टोला अनिल गोटे यांनी लगावला.नार-पार-तापीचे पाणी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या हक्काचे आहे. मात्र हे पाणी गुजरातला देण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. या विषयाचे सादरीकरण विधान परिषदेच्या सदस्यांना केले गेले; मात्र अधिवेशन सुरू झाल्यापासून मागणी करूनही ते विधानसभेच्या सदस्यांना दाखवले जात नाही. म्हणून भुजबळांना हा मार्ग अवलंबावा लागल्याचे वळसे म्हणाले. शेवटी त्यांनीच वेलमध्ये बसलेल्या भुजबळांसह सगळ्या सदस्यांना आसनावर बसण्याची विनंती केली.भुजबळ म्हणाले, सभागृहात बॅनर आणण्याचे काम याआधी मी एकदाच केले होते. मात्र त्यानंतर आजपर्यंत आपण कधीही वेलमध्ये उतरलो नव्हतो. महाराष्ट्राचे १३३ टीएमसी पाण्यातले २० टीएमसी पाणी मुंबईला देऊन बाकीचे सगळे गुजरातला देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे. आपण आपल्या पाण्यावरचा हक्क सोडला तर भविष्यात आपली अवस्था अत्यंत बिकट होईल. आणखी ५-१० वर्षांनी आपल्या हाती काहीच शिल्लक राहणार नाही, असेही भुजबळ या वेळी म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)