शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
3
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
4
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
5
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
6
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
7
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
8
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
9
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
10
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
11
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
12
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
13
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
14
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
15
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
16
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
17
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
18
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
19
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
20
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली

काँग्रेससोबत आघाडी हवी पण सन्मानजनक !

By admin | Published: January 24, 2017 3:40 PM

आम्हाला आघाडी हवीच आहे पण सन्माजनक अशी भूमिका राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मांडली.

अकोला : केंद्रात व राज्यात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाचा कारभार हा आराजकतेकडे जाणारा आहे, या पक्षाच्या जातीयवादी विचारधारे विरोधात धर्मनिरपेक्ष विचारांनी एकत्र आले पहिजे; ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे त्यामुळे आगामी महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणूकांमध्ये काँग्रेस सोबत आघाडी करण्यास आम्ही तयार आहोत. याचा अर्थ काँग्रेस व समविचारी पक्षांनी राष्ट्रवादी कमकुवत आहे असा काढू नये, आम्हाला आघाडी हवीच आहे पण सन्माजनक अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मांडली. अकोला येथील खुले नाट्यगृहामध्ये माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सोहळया निमित्त आयोजीत मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार प्रकाश गजभिये, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंतराव धोत्रे, माजी आमदार तुकाराम बिरकड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, अकोला महानगर अध्यक्ष अजय तापडीया, वाशीम जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, विदर्भ संघटक रामेश्वर पवळ, संतोष कोरपे आदी उपस्थित होते. तटकरे म्हणाले की, भाजपा-सेनेच्या सत्तेने सामान्यांचा भ्रमनिरास केला आहे. अच्छे दिन, बॅक खात्यामध्ये १५ लाख असे स्वप्न सर्वसामान्य जनतेला दाखविले, हे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकत नाही हे याच पक्षाचे ज्येष्ठ मंत्री आता खुले आम सांगत आहे. तर दूसरीकडे शेतकरी उध्वस्त करण्याचे धोरण या सरकारचे आहे. काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा करणारे आता मुसलमान मुक्त भारत अशी वल्गना करून लागले आहेत. यावरून त्यांच्यामधील जातीयवादी विचार स्पष्टपणे समोर येतो. हा देश लोकशाही विचारांचा देश असल्याने अशा धर्मांध शक्तींना जागा दाखविण्यासाठी धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षाची मोट बांधणे आवश्यक आहे त्यामुळेच आघाडीसाठी आम्ही सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगीतले. माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी शिवसेना सोडण्यामागील कारणे विषद करतांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. उद्धवांच्या आजूबाजुला हुजऱ्यांची फौज आहे, त्यांना शेतीमधील काही कळत नाही; शेतकरी हिताचा एखादा प्रस्ताव त्यांच्याकडे घेऊन गेलो तर ते आपला पक्ष व्यापाऱ्यांच्या भरवशावर चालतो अशी भूमिका मांडतात या शब्दात गावंडे यांनी आरोप केले. यावेळी जिल्हाध्यक्ष देशमुख यांचीही भाषण झाले. महानगर अध्यक्ष तापडीया यांनी प्रस्तावना केली. या मेळाव्याला जिल्हाभरातून मोठी उपस्थिती होती. गावंडे यांच्या अनेक समर्थकांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश घेतला.