Congress: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलाचे संकेत, मराठा व दलित जोडीला मिळू शकते नेतृत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 07:27 AM2023-04-21T07:27:47+5:302023-04-21T07:27:52+5:30
Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलाचे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ पक्षनेता बदलण्याची शक्यता आहे. नितीन राऊत, बंटी पाटील, सुनील केदार, यशोमती ठाकूर व अशोक चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष पदाच्या स्पर्धेत आहेत.
- आदेश रावल
नवी दिल्ली : महाराष्ट्रकाँग्रेसमध्ये मोठ्या बदलाचे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ पक्षनेता बदलण्याची शक्यता आहे. नितीन राऊत, बंटी पाटील, सुनील केदार, यशोमती ठाकूर व अशोक चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष पदाच्या स्पर्धेत आहेत.
दिल्लीतील सर्वोच्च नेतृत्व मराठा अध्यक्ष व दलित विधिमंडळ पक्ष नेता करण्याच्या फॉर्म्युल्यावरही निर्णय घेऊ शकते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर सर्व बदल केले जाणार आहेत. या सर्वांमध्ये नितीन राऊत यांची सर्वांत मोठी समस्या ही आहे की, त्यांचे सुपुत्र कुणाल राऊत हे महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. अशा स्थितीत नितीन राऊत यांची नजर विधिमंडळ पक्षनेत्याच्या खुर्चीवर आहे. अशोक चव्हाण यापूर्वीही प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. बंटी पाटील यांना अलीकडेच विधान परिषदेतील काँग्रेसचे नेते करण्यात आले आहे. अशा स्थितीत यशोमती ठाकूर अध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वांत पुढे दिसत आहेत.