“सत्ताधारी पुन्हा सत्तेत आल्यास लोकशाहीचा अंत, भविष्यात…”; काँग्रेसचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 09:15 AM2024-05-12T09:15:52+5:302024-05-12T09:17:03+5:30
सीबीआयचा दुरुपयोग राजकीय द्वेषापोटी केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : सत्ताधाऱ्यांकडून संविधानाच्या मूळ ढाच्यावरच आघात केला जात आहे. सध्या आणखी एक नवीन व्यवस्था अवलंबली जात आहे. यावेळी फक्त सुरत, इंदूर आणि राजस्थानात घडले आहे. तीन जागांवर इलेक्शनचे सिलेक्शन केले तर भविष्यात इलेक्शनची गरजच पडणार नाही. लोकशाहीचा अंत होईल, असा इशारा काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी दिला.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते. सिंघवी म्हणाले की, सरकारने सीबीआय, ईडी, निवडणूक आयोग सारख्या सर्व यंत्रणा स्वतःच्या नियंत्रणाखाली ठेवल्या आहेत. सीबीआयचा दुरुपयोग राजकीय द्वेषापोटी केला जात आहे.
पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या वक्तव्यात हिंदू-मुस्लीम मुद्यांशिवाय दुसरे काहीच नाही. निवडणूक रोख्यांची यादी पाहिली तर ईडीच्या छाप्यानंतर अनेक कंपन्यांनी भाजपला निधी दिल्याचे स्पष्ट होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.