काँग्रेसमधील खातेवाटपाचा तिढा सुटला; मंत्रिमंडळात थोरात 'जोरात'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 03:14 AM2020-01-03T03:14:06+5:302020-01-03T07:15:22+5:30

काही खात्यांची तिन्ही पक्षात अदलाबदल

Congress' account-sharing looms sharply, but nationalist 'home' clash! | काँग्रेसमधील खातेवाटपाचा तिढा सुटला; मंत्रिमंडळात थोरात 'जोरात'

काँग्रेसमधील खातेवाटपाचा तिढा सुटला; मंत्रिमंडळात थोरात 'जोरात'

Next

मुंबई : काँग्रेस पक्षाने खातेवाटपाचा वाद संपुष्टात आणला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गृह खात्याचा वाद अजून मिटलेला नाही. बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते जाणार असल्याची माहिती आहे. काही खात्यांची तिन्ही पक्षात अदलाबदल झाली आहे.

महसूल देता येत नसेल तर सार्वजनिक बांधकाम खाते आपल्याला मिळावे असा अशोक चव्हाण यांचा आग्रह होता. मात्र, हेच खाते नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनाही हवे होते. शेवटी ते चव्हाण यांना देण्यात आले आहे. आता ऊर्जा खात्यावर वडेट्टीवार आणि राऊत यांनी दावा सांगितला आहे. शालेय शिक्षण अमित देशमुख यांना तर महिला व बालविकास खाते यशोमती ठाकूर, वैद्यकीय शिक्षण - वर्षा गायकवाड, ओबीसी विभाग -सुनील केदार, वस्त्रोद्योग - असलम शेख यांना दिल्याचे समजते.

नवाब मलिक यांना कामगार, दिलीप वळसे पाटील यांना उत्पादन शुल्क आणि किमान कौशल्य, धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय, तर बाळासाहेब पाटील यांना सहकार व पणन खाते देण्यात येईल. अनिल देशमुख यांना गृह खाते देण्यावरुन असलेला वाद कायम आहे. हे खाते जयंत पाटील यांनी घ्यावे असा स्वत: शरद पवार आणि अजित पवार यांचा आग्रह आहे. मात्र त्यांनी जलसंपदासाठी आग्रह धरला आहे. जयंत पाटील यांनी नकार दिल्यास गृहखाते वळसे-पाटील यांना मिळावे, असा अजित पवार यांचा आग्रह आहे.

शिवसेनेचे अनिल परब यांना मुख्यमंत्री कार्यालयाचे मंत्री म्हणून तर आदित्य ठाकरे यांना पर्यावरण आणि उद्योग किंवा उच्च व तंत्रशिक्षण यापैकी एक, संजय राठोड यांना परिवहन तर गुलाबराव पाटील यांना कृषी खाते देण्याबद्दल चर्चा अंतिम टप्प्यात असताना पुन्हा काही खात्यांमध्ये बदल झाल्याची माहिती आहे.

मलिकांनी ‘एक्साईज’ खाते सोडले
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना देण्यात आलेले उत्पादन शुल्क खाते त्यांनी नाकारले असून त्याऐवजी त्यांना कामगार खाते देण्यात आले आहे. मात्र, गृह खात्यावरून निर्माण झालेला तिढा अद्याप सुटलेला नाही. हे खाते जयंत पाटील अथवा वळसे-पाटील यांच्याकडे असावे, असा पक्षात सूर आहे.

Web Title: Congress' account-sharing looms sharply, but nationalist 'home' clash!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.