काँग्रेसशी आघाडी आणि एमआयएमशी मैत्रीही : आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 02:14 AM2018-12-10T02:14:28+5:302018-12-10T02:15:01+5:30
भारिप बहुजन महासंघ आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करायला तयार आहे. परंतु, एमआयएमशी मैत्री कायम राहील, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे दिली.
उदगीर (जि़लातूर) : भारिप बहुजन महासंघ आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करायला तयार आहे. परंतु, एमआयएमशी मैत्री कायम राहील, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे दिली.
उदगीर येथे वंचित बहुजन विकास आघाडीची रविवारी दुष्काळ परिषद झाली. अॅड़ आंबेडकर म्हणाले, सत्ताधाऱ्यांना कुठल्याही निमित्ताने देशात दंगली घडवून आणायच्या आहेत़ मराठा समाजाला आरक्षण देऊन मराठा विरुद्ध इतर मागासवर्गीय (ओबीसी) यांच्यात वाद निर्माण करायचा होता़ मात्र पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेने सरकारचा हेतू ओळखून जनता शांत राहिली. तेव्हा इतर प्रश्नांद्वारे देशात सवर्ण विरुद्ध इतर मागासवर्गीय यांच्यात भांडण लावून येणाºया लोकसभेच्या निवडणुकीत सत्ता संपादनाचा मार्ग सुकर करायचा सत्ताधाºयांचा डाव आहे. त्यासाठीच भाजपाने सुनियोजितपणे शिवसेनेला अयोध्येत पाठवून राम मंदिराच्या प्रश्नावर लोकांच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न केला.
...तर सर्व जागा लढविणार
काँग्रेससोबत बोलणी फिस्कटल्यास लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढविण्याचा निर्धार असून लिंगायत समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. धनगर समाजाचा भ्रमनिरास झाल्यामुळे तो आता आमच्यासोबत या निवडणुकीत राहणार असल्याचे ते म्हणाले.