काँग्रेस पक्षाने व महाराष्ट्राने निष्ठावंत नेता गमावला- राजेंद्र दर्डा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2018 10:48 PM2018-03-09T22:48:55+5:302018-03-09T23:28:38+5:30

शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता म्हणून पतंगरावांची वेगळी ओळख होती.

congress and maharashtra lost loyalist leader says rajendra darda | काँग्रेस पक्षाने व महाराष्ट्राने निष्ठावंत नेता गमावला- राजेंद्र दर्डा

काँग्रेस पक्षाने व महाराष्ट्राने निष्ठावंत नेता गमावला- राजेंद्र दर्डा

googlenewsNext

मुंबई- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं आज मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये निधन झालं. पतंगराव कदम यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. 

शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता म्हणून पतंगरावांची वेगळी ओळख होती. १९९९ ते २०१४ या पंधरा वर्षांच्या काळात आमदार आणि मंत्री म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याचा योग मला आला. अडचणीच्या वेळी ही वातावरणातील तणाव कमी करून हास्य फुलवण्याचे अनोखे कसब त्यांच्याकडे होते. ते औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळीही त्यांचा माझा जवळचा संबंध आला. शिक्षण आणि सहकार या क्षेत्रात त्यांनी लक्षणीय असे काम केले आहे. उद्योगमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम ही नोंद घेण्याजोगे आहे. त्यांच्या जाण्यामुळे एक निष्ठावंत नेत्याला काँग्रेस पक्ष व महाराष्ट्र  मुकला आहे. मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटायचो, तेव्हा ते बाबूजींच्या म्हणजे जवाहरलालजी दर्डांच्या अनेक आठवणी सांगायचे. त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राने कायम हसतमुख असणारा नेता गमावला आहे, अशी भावना लोकमत वृत्तसमूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केली आहे. 

 

पतंगराव कदम यांचा प्रवास थक्क करणारा
सांगली जिल्ह्यातील सोनसळ या लहान खेड्यातील सामान्य शेतकरी कुटुंबात पतंगरावांचा जन्म झाला. गावात चौथीपर्यंतचे शिक्षण घेऊन पुढे कुंडलला माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुणे गाठले. द्विपदवीधर झाले. शिक्षक झाले. एकशिक्षकी शाळेत काम केले. नंतर त्यांनी तेथेच १० मे १९६४ रोजी भारती विद्यापीठाची स्थापना केली. या संस्थेचे ते तहहयात कुलपती होते. काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून धडपडणारे पतंगराव १९८० मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आणि अडीचशे मतांनी पराभूत झाले. १९८५ मध्ये त्यांनी पुन्हा लढत दिली आणि आमदार झाले. तेव्हापासून १९९५ चा अपवाद वगळला तर सहावेळा ते निवडून आले.
 

Web Title: congress and maharashtra lost loyalist leader says rajendra darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.