राज्यात सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यातच शुक्रवारी मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला महाविकास आघाडीचे बरेच नेते उपस्थित होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा मुद्दाही उपस्थित केला. उद्धव ठाकरेशरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेत म्हणाले की, त्यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा? हे जाहीर करावे. यावर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी कांग्रेसची भूमिका मांडत, आपले काम मुख्यमंत्री पदाचा चहा समोर करणे नाही. महाविकास अघाडीचे सर्व नेते एकत्र बसून यासंदर्भात निर्णय घेतील. एवढेच नाही तर शरद पवार यांनीही नाना पटोले यांचे मौन समर्थन केले.
शरद पवारांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमत्रीपदाचा चेहरा कोण असायला हवा, हे त्यांनी सांगावे. आपणही पवारांच्या प्रस्तावाचे समर्थन करू. मात्र, शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यावर स्पष्टपणे काहीही उत्तर दिले नाही. ते केवळ एवढेच म्हणाले की, "आपल्याला एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढायची आहे. सर्व पक्षांना एकत्रितपणे महाविकास अघाडीतील उमेदवारांना विजयी करण्यासाठी काम करायचे आहे." शरद पवार यांनी असे म्हणत नाना पटोले यांच्या म्हणण्याचे समर्थनच केल्याचे मानले जात आहे.
शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा -शरद पवार म्हणाले, आजही काही संस्था आहेत. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष. पंतप्रधान हे संस्था आहेत. विरोधी पक्षनेता हे संस्था आहेत. पंतप्रधानांची प्रतिष्ठा देशाने ठेवली पाहिजे. विरोधी पक्षाची प्रतिष्ठाही ठेवली पाहिजे. 15 ऑगस्टला विरोधी पक्षनेते पाचव्या ओळीत बसले होते. मी विरोधी पक्षनेता होतो. वाजपेयी पंतप्रधान होते. माझी बसण्याची व्यवस्था कॅबिनेट मंत्र्यांसोबत होती. मनमोहन सिंग पंतप्रधान होते. तेव्हा दिवंगत सुषमा स्वराज या विरोधी पक्षनेत्या म्हणून कॅबिनेट मंत्र्यांसोबत बसल्या होत्या. याचा अर्थ व्यक्ती महत्त्वाची नाही. त्या संस्था महत्त्वाच्या आहेत. त्यांची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. या संस्था आहेत. लोकशाहीच्या संस्था आहेत. त्याचा सन्मान केला पाहिजे, अशा शब्दांत शरद पवार यांनी राहुल गांधी यांना दिलेल्या जागेवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
या बैठकीला, सुप्रिया सुळे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटिल, संजय राऊत आणि आदित्य ठाकरेही उपस्थित होते.