काँग्रेसकडून 51 उमेदवारांची यादी जाहीर, अशोक चव्हाण, प्रणिती शिंदेंसह...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 07:11 PM2019-09-29T19:11:32+5:302019-09-29T20:01:30+5:30

काँग्रेसने सोलापूर मध्य येथून माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे

Congress announces list of 51 candidates, including Ashok Chavan, Praniti Shinde ... | काँग्रेसकडून 51 उमेदवारांची यादी जाहीर, अशोक चव्हाण, प्रणिती शिंदेंसह...

काँग्रेसकडून 51 उमेदवारांची यादी जाहीर, अशोक चव्हाण, प्रणिती शिंदेंसह...

Next

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संभाव्य उमेदवारांना एबी फॉर्मवाटप केल्यानंतर आता काँगेसने विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने 51 उमेदवारांची यादी जाहीर केली असून पहिल्याच यादीत माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर उत्तर येथून नितीन राऊत यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. 

काँग्रेसने सोलापूर मध्य येथून माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.     

काँग्रेसच्या 51 उमेदवारांची नावे

अक्कलकुवा - के.सी पडवी
शहादा - पदमाकर विजयसिंग वालवी
नवापूर - शिरिष नाईक
रावेर - शिरिष चौधरी
बुलडाणा - हर्षवर्धन सकपाळ
मेहकर- अनंत वानखेडे
रिसोड - अमित जनक
धामनगाव - विरेंद्र जगताप
तिवसा - यशोमती ठाकूर
आर्वी - अमर शरद काळे
देवळी- रंजीत प्रताप कांबळे
सावनेर- सुनील छत्रपाल केदार
नागपूर (उत्तर)- डॉ. नितीन राऊत
ब्रह्मपुरी- विजय नामदेवराव वजेट्टीवार
चिमुर- सतीश मनोहर वर्जुराकर
वरोरा- प्रतिभा सुरेश धानोरकर
यवतमाळ- अनिल बाळासाहेब मांग्रुळकर
भोकर- अशोकराव शंकरराव चव्हाण
नांदेड (उत्तर)- डी.पी. सावंत
नायगाव- वसंतराव बळवंतराव चव्हाण
देगलूर- रावसाहेब जयवंत अनंतपुरकर
काळमनुरी- संतोष कौतिका तर्फे
पाथरी- सुरेश अंबादास वारपुडकर
फुलंब्री- डॉ. कल्याण वैजंथराव काळे
मालेगाव (मध्य)- शैख असिफ शैख राशिद
अंबरनाथ- रोहित चंद्रकात साळवे
मिरा भाईंदर- सय्यद मुझफ्फर हुसेन
भांडूप (पश्चिम)- सुरेश हरिशचंद्र कोपरकर
अंधेरी (पश्चिम)- अशोकभाऊ जाधव
चांदिवली- मोहम्मद आरिफ नसीम खान
चेंबूर- चंद्रकात दामोदर हंदोरे
वांद्रे (पूर्व)- जिशान जियाउद्दीन सिध्दीकी
धारावी- वर्षा एकनाथ गायकवाड
सायन कोळीवाडा- गणेश कुमार यादव
मुंबादेवी- अमिन अमीराली पटेल
कोलाबा- अशोक अर्जुनराव जगताप
महाड- माणिक मोतिराम जगताप
पुरंदर- संजय चंद्रकांत जगताप
भोर- संग्राम अनंतराव तोपते
पुणे- रमेश अनंतराव बागवे
संगमनेर- विजय बाळासाहेब थोरात
लातुर (शहर)- अमित विलासराव देशमुख
निलंगा- अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर
औसा- बासवराज माधवराव पाटील
तुळजापूर- मधुकरराव देवराम चव्हाण
सोलापूर शहर (मध्य)- प्रणिती सुशील कुमार शिंदे
सोलापूर (दक्षिण)- मौलबी बाशुमिया सयीद
कोल्हापूर (दक्षिण)- ऋतुराज संजय पाटील
कारवीर- पी.एन.पाटील सादोळीकर
पळुस-कडेगाव- डॉ. विश्वजीत पतंगराव कदम
 

Web Title: Congress announces list of 51 candidates, including Ashok Chavan, Praniti Shinde ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.