शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संभाव्य उमेदवारांना एबी फॉर्मवाटप केल्यानंतर आता काँगेसने विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने 51 उमेदवारांची यादी जाहीर केली असून पहिल्याच यादीत माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर उत्तर येथून नितीन राऊत यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
काँग्रेसने सोलापूर मध्य येथून माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
काँग्रेसच्या 51 उमेदवारांची नावे
अक्कलकुवा - के.सी पडवीशहादा - पदमाकर विजयसिंग वालवीनवापूर - शिरिष नाईकरावेर - शिरिष चौधरीबुलडाणा - हर्षवर्धन सकपाळमेहकर- अनंत वानखेडेरिसोड - अमित जनकधामनगाव - विरेंद्र जगतापतिवसा - यशोमती ठाकूरआर्वी - अमर शरद काळेदेवळी- रंजीत प्रताप कांबळेसावनेर- सुनील छत्रपाल केदारनागपूर (उत्तर)- डॉ. नितीन राऊतब्रह्मपुरी- विजय नामदेवराव वजेट्टीवारचिमुर- सतीश मनोहर वर्जुराकरवरोरा- प्रतिभा सुरेश धानोरकरयवतमाळ- अनिल बाळासाहेब मांग्रुळकरभोकर- अशोकराव शंकरराव चव्हाणनांदेड (उत्तर)- डी.पी. सावंतनायगाव- वसंतराव बळवंतराव चव्हाणदेगलूर- रावसाहेब जयवंत अनंतपुरकरकाळमनुरी- संतोष कौतिका तर्फेपाथरी- सुरेश अंबादास वारपुडकरफुलंब्री- डॉ. कल्याण वैजंथराव काळेमालेगाव (मध्य)- शैख असिफ शैख राशिदअंबरनाथ- रोहित चंद्रकात साळवेमिरा भाईंदर- सय्यद मुझफ्फर हुसेनभांडूप (पश्चिम)- सुरेश हरिशचंद्र कोपरकरअंधेरी (पश्चिम)- अशोकभाऊ जाधवचांदिवली- मोहम्मद आरिफ नसीम खानचेंबूर- चंद्रकात दामोदर हंदोरेवांद्रे (पूर्व)- जिशान जियाउद्दीन सिध्दीकीधारावी- वर्षा एकनाथ गायकवाडसायन कोळीवाडा- गणेश कुमार यादवमुंबादेवी- अमिन अमीराली पटेलकोलाबा- अशोक अर्जुनराव जगतापमहाड- माणिक मोतिराम जगतापपुरंदर- संजय चंद्रकांत जगतापभोर- संग्राम अनंतराव तोपतेपुणे- रमेश अनंतराव बागवेसंगमनेर- विजय बाळासाहेब थोरातलातुर (शहर)- अमित विलासराव देशमुखनिलंगा- अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकरऔसा- बासवराज माधवराव पाटीलतुळजापूर- मधुकरराव देवराम चव्हाणसोलापूर शहर (मध्य)- प्रणिती सुशील कुमार शिंदेसोलापूर (दक्षिण)- मौलबी बाशुमिया सयीदकोल्हापूर (दक्षिण)- ऋतुराज संजय पाटीलकारवीर- पी.एन.पाटील सादोळीकरपळुस-कडेगाव- डॉ. विश्वजीत पतंगराव कदम