शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

“देशात विदर्भासह ७५ वेगळी राज्य करा”; काँग्रेसचे मोदींना पत्र? प्रशांत किशोरही ॲक्टिव्ह!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 4:30 PM

प्रशांत किशोर यांच्या मदतीने स्वतंत्र विदर्भाची चळवळ अधिक प्रभावीपणे राबवण्याचे ठरवले आहे, असे सांगितले जात आहे.

नागपूर: राज्यात एकीकडे सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. यातच राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली असून, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही देशभरात सुरू आहे. मात्र, देशाची लोकसंख्या प्रचंड वाढली असून, राज्यांचे नियोजन अधिक योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी देशात  देशात विदर्भासह ७५ वेगळी राज्य करा, अशा आशयाचे पत्र काँग्रेसकडून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. तसेच स्वतंत्र विदर्भाची मागणी अधिक तीव्र करण्यासाठी रणनीतिकार प्रशांत किशोर सक्रीय होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. देश अमृत महोत्सवी वर्ष साजरे करतोय, पण वाढत्या लोकसंख्येची गणितं कशी जुळवणार? त्यासाठी राज्यांचीदेखील संख्या वाढवली पाहिजे. अमेरिका, स्वित्झर्लंडसारख्या देशांमध्ये लोकसंख्येनुसार राज्यांची रचना करण्यात आली आहे. त्यामुळेच तेथील राज्ये प्रगत आहेत. भारतात राज्यांची संख्या लोकसंख्येच्या गणितानुसार वाढवल्यास प्रत्येक राज्यावर जास्त लक्ष केंद्रित करून विकास करता येईल. आता संपूर्ण देशाची विभागणीच २९ ऐवजी ७५ राज्यांमध्ये करावी, असे आशिष देशमुख यांनी म्हटले आहे. यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिणार आहेत. 

प्रशांत किशोर यांनीही केली कामाला सुरुवात!

स्वतंत्र विदर्भाची मागणी अनेक वर्षांपासून लावून धरण्यात आली आहे. मागणी अधिक तीव्र करण्यासाठी ज्येष्ठ रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी विनंतीला मान देऊन यासाठी काम सुरु केले आहे, अशी माहिती आशिष देशमुख यांनी दिली. स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली. लोकसंख्या वाढली आहे. १३० कोटी जनतेचा देश आणि २९च राज्य आहेत. म्हणून ७५ राज्य करावीत, अशी मागणी करतोय. महाराष्ट्र १९६० मध्ये स्थापन झाला. तेव्हा ३ कोटी लोकसंख्या होती. आता तीच लोकसंख्या १३ कोटींवर पोहोचली आहे. राज्य चांगली चालवायची असतील तर त्यांचे विभाजन होणे गरजेचे आहे. राज्यांचे सरकार लोकांसाठी प्रभावीपणे काम करणे अपेक्षित असेल तर आपल्या देशातील राज्य वाढली पाहिजेत. या सर्व मागण्यांसाठी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे आशिष देशमुख यांनी सांगितले. ते टीव्ही९शी बोलत होते. 

दरम्यान, रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी कित्येक राज्यांचा अभ्यास केला आहे. पंतप्रधान मोदी, ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी, तेलंगणाचे केसीआर, नितीश कुमार या सर्व लोकांच्या विजयात अत्यंत अभ्यासपूर्ण योगदान दिले आहे. आता ते स्वतंत्र विदर्भ राज्याच्या चळवळीत उतरण्यासाठी तयार झाले आहेत. आता त्यांच्या मदतीने स्वतंत्र विदर्भाची चळवळ आम्ही अधिक प्रभावीपणे राबवण्याचे ठरवले आहे. मला अपेक्षा आहे की, या चळवळीच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि भाजपला देशातील ३०वे राज्य लवकरच स्थापन करण्यासाठी बाध्य करू, असे आशिष देशमुख म्हणाले.  

टॅग्स :congressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारAshish Deshmukhआशीष देशमुखPrashant Kishoreप्रशांत किशोरnagpurनागपूर