'सत्तेसाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकतात'; अशोक चव्हाणांचा भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 06:59 PM2020-01-24T18:59:36+5:302020-01-24T19:08:57+5:30

फोन टॅपिंगवरून काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

congress ashok chavan slams bjp on phone tapping | 'सत्तेसाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकतात'; अशोक चव्हाणांचा भाजपावर निशाणा

'सत्तेसाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकतात'; अशोक चव्हाणांचा भाजपावर निशाणा

googlenewsNext

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचे फोन टॅपिंग केले असल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी सरकारकडून चौकशीचे आदेश देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. फोन टॅपिंगवरून काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

'सत्तेसाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकतात' असं म्हणत अशोक चव्हाण यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. शुक्रवारी (24 जानेवारी) अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. 'निरंकूश व अखंड सत्ता हाच भाजपाचा एकमेव अजेंडा आहे. सत्तेसाठी ते कोणत्याही पातळीला जाऊ शकतात, हे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे फोनटॅपिंगच्या आरोपामध्ये तथ्य असण्याची दाट शक्यता असून, मुख्यमंत्र्यांनी सखोल उच्चस्तरीय चौकशी करावी' असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. 

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यास महत्वाची भूमिका संजय राऊत यांनी निभावली होती. संजय राऊत यांना देखील आपला फोन टॅप करत असल्याची माहिती मिळताच ट्विट करुन माझा फोन टॅप केला जात असल्याची माहिती मला भाजपाच्या एका वरिष्ठ मंत्र्यांनी दिली असल्याचे सांगितले आहे. तसेच माझे बोलणे जर कोणाला ऐकायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य असल्याने मी कोणतेही काम लपून करत नसल्याचे संजय राऊत यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे.

सरकारने विधानसभा निवडणुकीच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे फोन व विशेषत: व्हॉट्सअ‍ॅप मेसेज टॅप केल्याचा आरोप केला गेला होता. त्याविषयी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही प्रसारमाध्यमांसमोर काही आरोप केले होते. यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फोन टॅपिंग प्रकरणी सायबर सेलला चौकशीचे आदेश दिले असल्याचे सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Corona Virus : कोरोना व्हायरसचे मुंबईत २ संशयित रुग्ण; कस्तुरबा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष

Corona Virus : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी चीन उभारणार 10 दिवसांत रुग्णालय

पंतप्रधान मोदी स्मृती इराणींसमोरच म्हणाले, सास भी कभी बहू थी; अन्...

Maharashtra Bandh Live: भाजपाने विरोध करुनही महाराष्ट्र बंद यशस्वी - आंबेडकर

Ind vs NZ, 1st T20 : पहिल्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर विजय

 

Web Title: congress ashok chavan slams bjp on phone tapping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.