सभागृह चालू देणार नाही : शेतक:यांना पॅकेज जाहीर करा
नागपूर : सोयाबीन बुडाले, कापूस व धानाला भाव नाही. संकटग्रस्त शेतक:यांसाठी राज्य सरकारने तातडीने आर्र्थिक पॅकेजची घोषणा करावी, काँग्रेस आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, अन्यथा सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही. असा हल्लाबोल करीत प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी विधानसभेवर मोर्चा काढला. यात विदर्भातील शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
दुष्काळ, अतिवृष्टी अशा नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतक:यांना काँग्रेस सरकारने गेल्या तीन वर्षात 13क्क्क् कोटींची मदत केली. दुसरीकडे विरोधात असताना केलेल्या मागणीनुसार कापसाला भाव देण्याचे भाजप नेते टाळत आहेत. काही दिवस वाट बघितली परंतु निर्णय नाही. आता राज्यावर कर्जाचा डोंगर उभा असल्याचे सांगत आहे. नुसते गोड बोलून व जाहिरातबाजी करून लोकांची दिशाभूल करू नका. ते तुम्हाला माफ करणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोर्चाला मार्गदर्शन करताना दिला. केंद्रात हुकूमशाही विचाराची माणसे सत्तेवर आली आहेत. ते घटना बदलायला निघाले आहेत. काँग्रेसच्या पाच आमदारांना निलंबित करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु आम्ही तो हाणून पाडू असा इशारा त्यांनी दिला. अपु:या पावसामुळे खरीप हंगामातील पीक बुडाले आहे. हवालदिल शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांना तातडीने दिलासा देण्याची जबाबदारी सरकारची आहे. शेतक:यांच्या मागण्यांवर विधिमंडळात उद्या आणि परवा चर्चा घडवून आणू. त्यानंरही निर्णय झाला नाही तर हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले.
काँग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन व आर्थिक पॅकेज यावर निर्णय झाला नाही तर तालुका व जिल्हा स्तरावर मोर्चे, धरणो आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला.
राज्यातील भाजप नेतृत्वातील सरकार सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरले आहे. दुष्काळी परिस्थितीत केंद्र व राज्य सरकार शेतक:यांना मदत जाहीर करतील अशी अपेक्षा होती. परंतु या दृष्टीने कोणतीही पावले उचललेली नाही. शेतक:यांना पॅकेज देणार नाही तोर्पयत विधानसभेचे कामकाज चालू देणार नाही. असा इशारा विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. उपनेते विजय वडेट्टीवार, आमदार अमर काळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी, माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी मंत्री नितीन राऊत, वर्षा गायकवाड, मुजफ्फर हुसैन यांच्यासह पक्षाचे आमदार व पदाधिकारी व्यासपीठावर होते.
च्दुष्काळग्रस्त शेतक:यांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करावी
च्काँग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन मागे घ्यावे
शेतक:यांची दिंडी
शेतक:यांना न्याय मिळावा यासाठी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात आर्वी ते नागपूर अशी दिंडी काढण्यात आली. यात हजारो शेतकरी सहभागी झाले होते.
गर्दी न जमल्याने मोर्चाला उशीर
दीक्षा भूमी येथून सकाळी 11 वाजता मोर्चा निघणार होता. परंतु 12 वाजेर्पयत येथे गर्दी न जमल्याने मोर्चा उशिरा काढण्यात आला.