“स्वातंत्र्यदिन-राष्ट्रगीताचा अपमान; संभाजी भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 12:49 PM2023-06-28T12:49:27+5:302023-06-28T12:50:32+5:30

Sambhaji Bhide Vs Congress: भाजप व संघ विचाराच्या लोकांना अखंड भारतावर तर बोलण्याचा अधिकारच नाही, अशी टीका करण्यात आली आहे.

congress atul londhe criticized sambhaji bhide guruji over his statement | “स्वातंत्र्यदिन-राष्ट्रगीताचा अपमान; संभाजी भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा”

“स्वातंत्र्यदिन-राष्ट्रगीताचा अपमान; संभाजी भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा”

googlenewsNext

Sambhaji Bhide Vs Congress: मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी भारताला १५ ऑगस्टला मिळालेले स्वातंत्र्य खरे नाही, असे विधान करुन तमाम भारतीयांचा अपमान केला आहे. संभाजी भिडे यांचे विधान हे लाखो स्वांतत्र्य सैनिकांचाही अपमान करणारे आहे ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून सर्वस्व अर्पण केले. बेताल विधान करून देशाचे स्वातंत्र्य व राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर तात्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्यथा तो कसा दाखल करायचा ते काँग्रेस बघून घेईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.

संभाजी भिडेंच्या विधानाचा जाहीर निषेध करुन अतुल लोंढे यांनी भाजपावर तोफ डागली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे अभ्यासक आहेत. त्यांनी संविधान नीट वाचावे म्हणजे त्यांना कळेल की १५ ऑगस्टला भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे केवळ राजकीय स्वातंत्र्य नाही तर सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्वातंत्र्याची ती नांदी होती. जे स्वातंत्र्य मनुस्मृतीने या देशातील बहुजन समाजाला पाच हजार वर्षांपासून नाकारले होते. भाजप व संघ विचाराच्या लोकांना अखंड भारतावर तर बोलण्याचा अधिकारच नाही, अशी टीका अतुल लोंढे यांनी केली.

तुम्ही संविधान दिवस काळा दिवस म्हणून पाळणार?

शामाप्रसाद मुखर्जी यांनी अशा मुस्लीम लिग बरोबर युती केली होती ज्यांनी १९४० मध्ये स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली होती. तशी मांडणी सावरकर यांनीही केली होती, म्हणजे खरा इतिहास आता समोर येत आहे. तुम्ही संविधान दिवस काळा दिवस म्हणून पाळणार? १९४८ मध्ये तिरंगा पायदळी तुडवला, यातून लक्षात येते की आपणास स्वातंत्र्य व संविधान मान्य नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा मनुस्मृतीचेच समर्थक आहेत, संपूर्ण बहुजन समाज व स्त्रीयांनी आपल्या पायाखाली राहिले पाहिजे अशी यांची मानसिकता आहे, अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो व संभाजी भिडेंवर लवकरात लवकर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे. 

दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये धमक असेल तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा सातत्याने अपमान करणाऱ्या या गोडसेंच्या प्रवृत्तींवरही कारवाई करा, असेही लोंढे म्हणाले.

 

Web Title: congress atul londhe criticized sambhaji bhide guruji over his statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.