“पवार-आंबेडकर भेट मविआसाठी सकारात्मक, वंचितच्या प्रवेशाला काँग्रेसचा विरोध नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 12:49 PM2023-04-25T12:49:33+5:302023-04-25T12:51:59+5:30

Maharashtra Politics: राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत मांडण्यात आले आहे.

congress atul londhe reaction over ncp sharad pawar and vba prakash ambedkar meet | “पवार-आंबेडकर भेट मविआसाठी सकारात्मक, वंचितच्या प्रवेशाला काँग्रेसचा विरोध नाही”

“पवार-आंबेडकर भेट मविआसाठी सकारात्मक, वंचितच्या प्रवेशाला काँग्रेसचा विरोध नाही”

googlenewsNext

Maharashtra Politics: अलीकडेच वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाली होती. यावरून अनेक राजकीय आखाडे बांधण्यात आले. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. याच आता शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची झालेली भेट महाविकास आघाडीसाठी सकारात्मक ठरली आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाचा विरोध काँग्रेस करत नाही, असे मत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, व्हाय. बी. चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. राज्याच्या राजकारणात लवकरच मोठे राजकीय भूकंप होणार असे वक्तव्य अलीकडेच प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवारांसोबत झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, शरद पवार यांनी या भेटीबाबत खुलासा केला. प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी हे दोघेही कर्नाटकात काही जागा लढवत आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट झाल्याच्या चर्चांना शरद पवारांकडून दुजोरा देण्यात आला. 

वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाबाबत काँग्रेसचा विरोध नाही

राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट महाविकास आघाडीसाठी सकारात्मक ठरली आहे, असे अतुल लोंढे यांनी सांगितले. तसेच चित विकास आघाडीच्या मविआ मधील प्रवेशासाठी काँग्रेस विरोधात आहे का, असा प्रश्न अतुल लोंढे यांना विचारण्यात आला होता. तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाबाबत काँग्रेसचा विरोध नाही, असे अतुल लोंढे यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी प्रकाश आंबडेकर आणि उद्धव ठाकरे यांचीही भेट झाली होती. त्यावेळीही शिवसेना आणि वंचित अशा युतीची शक्यता वर्तवली जात होती. त्या भेटीनंतर काही नेत्यांनी फक्त शिवसेनेबरोबर युती करण्यापेक्षा महाविकास आघाडीमध्ये जर वंचितचा समावेश झाला तर त्याचा फायदा वंचितलाही होईल अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. महाविकास आघाडीमध्ये वंचितची एन्ट्री झाल्यास त्यांचे स्थान कितवे असणार? वंचित महाविकास आघाडीमधील चौथा पक्ष असणार का? किंवा मग वंचित महाविकास आघाडीमध्ये आल्यावर देखील ठाकरे-वंचित असे स्थान असणार अशा काही शक्यता वर्तवल्या जात आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: congress atul londhe reaction over ncp sharad pawar and vba prakash ambedkar meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.