चंद्रपूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसची पार पीछेहाट झाली असून, भाजपाने मात्र निर्विवाद बहुमत मिळविले आहे.जिल्हा परिषदेच्या ५६ जागांपैकी ३३ आणि पंचायत समितीच्या ११२ जागांपैकी ७१ जागांवर भाजपाला विजय मिळाला आहे. त्या तुलनेत काँग्रेसला जिल्हा परिषदेच्या २० तर पंचायत समितीच्या ३३ जागांवरच समाधान मानावे लागले आहे.भाजपाने विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढविल्या तर काँग्रेसने नोटाबंदी, विद्यमान सरकारच्या वारेमाप घोषणा, दुष्काळ या मुद्द्यावर निवडणुका लढविल्या. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री, वित्तमंत्री, केंद्रीय गृहराज्यमंत्री प्रचारात उतरले होते. तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षांसह स्थानिक नेत्यांनीच प्रचाराच्या सभांवर भर दिला. आघाडी अथवा युतीविरहित या निवडणुका राहल्या. शिवसेनेने आधीपासूनच स्वबळाची घोषणा केली होती. आमदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढल्या होत्या. मात्र शिवसेनेला खातेही उघडता आले नाही. राष्ट्रवादी काँगे्रस आणि काँगे्रस आघाडी होण्याची अपेक्षा असतानाही केवळ नेत्यांच्या भूमिकेमुळे संबंध ताणले गेले. परिणामत: अखेरच्या क्षणी आघाडी तोडल्याची घोषणा झाल्याने त्याचा झटका या दोन्ही पक्षांना बसला आहे. भाजपाने मुसंडी मारली आहे. चंद्रपूरपक्षजागाभाजपा३३शिवसेना00काँग्रेस२०राष्ट्रवादी00इतर0३
चंद्रपूरमधून काँग्रेसची पीछेहाट
By admin | Published: February 24, 2017 5:00 AM