राजकारणी आणि संपादक यांमध्ये गल्लत: बाळासाहेब थोरातांची संजय राऊतांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 12:36 PM2021-03-30T12:36:30+5:302021-03-30T12:38:14+5:30

संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

congress balasaheb thorat criticised sanjay raut over sharad pawar and upa statement | राजकारणी आणि संपादक यांमध्ये गल्लत: बाळासाहेब थोरातांची संजय राऊतांवर टीका

राजकारणी आणि संपादक यांमध्ये गल्लत: बाळासाहेब थोरातांची संजय राऊतांवर टीका

Next
ठळक मुद्देकाँग्रेसची संजय राऊत यांच्यावर टीकासंजय राऊत राजकारणी आणि संपादक - थोरातअशा बातम्यांना आम्ही फार महत्व देत नाही - थोरात

मुंबई : महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांमधील घटना आणि राजकारण यांवर रोखठोकपणे भाष्य करणाऱ्या संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबद्दल काँग्रेसमधील नाराजी वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी युपीएचं नेतृत्व करण्याबाबत संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही संजय राऊत यांना टोला लगावला आहे. (congress balasaheb thorat criticised sanjay raut over sharad pawar and upa statement)

संजय राऊत यांनी शरद पवार यांनी युपीएचं नेतृत्व करावे, असे वक्तव्य केले होते. दुसरीकडे, शरद पवार यांनी अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठी नाराजी असून, काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणी भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. संजय राऊत यांची राजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत होत आहे, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत राजकारणी आणि संपादक

संजय राऊत हे एका बाजूला राजकारणी आहेत. पण ते संपादकही आहेत. कदाचित राजकारणी आणि संपादक यामध्ये त्यांची गल्लत होते का काय असे वाटायला लागते. आघाडी सरकार होण्यात त्यांचा मोठा सहभाग असल्याचे आम्ही जाहीरपणे सांगत असतो, असे म्हणत युपीएचे नेतृत्व सोनिया गांधीच करणार आहेत. शेवटी काँग्रेस हा देशव्यापी पक्ष आहे. देशाचे नेतृत्व काँग्रेसकडे आहे आणि त्यांच्याकडेच राहणार आहे. कठीण दिवस निघून जातील आणि पुन्हा काँग्रेसचे दिवस येतील. त्यामुळे अशी कल्पना मांडणे मला योग्य वाटत नाही. अशी वक्तव्य करून मनात दोष निर्माण होतो हे त्यांनी करू नये, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेतलं, तेव्हाच सांगितलं होतं, अडचणीत याल: संजय राऊत

अशा बातम्यांना आम्ही फार महत्व देत नाही

शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेटीबाबत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, अशा बातम्यांना आम्ही फार महत्व देत नाही. राष्ट्रवादीने यासंबंधी स्पष्ट खुलासा केला आहे. पवारांच्या तब्येतीची विचारणा करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी बोललो. त्यांनी मुद्दामून हा विषय काढला आणि कसे लोक भेद, गैरसमज निर्माण करत असल्याचे सांगितले. त्यामुळे अशा प्रकारचे वेगळं काही असेल असे मला वाटत नाही, असे थोरात म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. मुळात शिवसेना यूपीएचा भागच नाही. मग त्यांना याबाबत चर्चा करण्याचा किंवा मत नोंदवण्याचा अधिकारच नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले होते.

Web Title: congress balasaheb thorat criticised sanjay raut over sharad pawar and upa statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.