“त्यापेक्षा इथल्या मातीचं ऋण फेडलं, तर बरं होईल”; थोरातांचे पीयुष गोयलांना प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 03:01 PM2021-04-19T15:01:22+5:302021-04-19T15:05:45+5:30

corona: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पीयुष गोयल यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

congress balasaheb thorat slams piyush goyal over his statement | “त्यापेक्षा इथल्या मातीचं ऋण फेडलं, तर बरं होईल”; थोरातांचे पीयुष गोयलांना प्रत्युत्तर 

“त्यापेक्षा इथल्या मातीचं ऋण फेडलं, तर बरं होईल”; थोरातांचे पीयुष गोयलांना प्रत्युत्तर 

Next
ठळक मुद्देबाळासाहेब थोरातांचे पियुष गोयल यांना प्रत्तुत्यरत्यापेक्षा मातीचं ऋण फेडले, तर बरे होईल - थोरातराज्याला ऑक्सिजन कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करा - थोरात

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात भीतीदायक वातावरण तयार होत चालले आहे. अनेक राज्यांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्सची कमतरता, कोरोना लसींचा तुडवडा जाणवत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. यातच केंद्रीयमंत्री पीयुष गोयल यांनी, कोरोनाच्या काळात ठाकरे सरकार हे निर्लज्ज राजकारण करत आहे, अशी टीका केली. यावरून पुन्हा राजकारण सुरू तापू लागले आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पीयुष गोयल यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. पियूष गोयल यांनी महाराष्ट्रावर टीका करण्यापेक्षा इथल्या मातीचे ऋण फेडले तर बरे होईल, असे थोरात यांनी म्हटले आहे. (balasaheb thorat slams piyush goyal over his statement)

केंद्रीय मंत्री पीयुष गोयल महाराष्ट्राची वकिली करायची सोडून जावडेकरांप्रमाणे महाराष्ट्रविरोधी तुणतुणे वाजवत आहेत. महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवून केंद्र सरकार मेहरबानी करत आहे का, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केला. आम्हाला केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. पण केंद्र सरकार आम्हाला अपेक्षित मदत करत नाही. त्यामुळे केंद्र सरकार अन्याय करत असल्याची भावना निर्माण झाली आहे, असेही थोरात यांनी म्हटले आहे. बाळासाहेब थोरात मीडियाशी बोलत होते. 

“कोरोनाच्या काळात पंतप्रधान मोदी १८-१९ तास काम करतायत, राजकारण करू नका”

राज्याला ऑक्सिजन कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करा

पीयुष गोयल महाराष्ट्राने ऑक्सिजनची मागणी कमी करावी, असे सांगतात. आम्ही ऑक्सिजनची मागणी कमी करावी, म्हणजे नक्की काय करावे, हे त्यांनी सांगावे. त्यांच्या वक्तव्याचा अर्थ आम्हाला समजलेला नाही. पीयुष गोयल हे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांनी राज्याला ऑक्सिजन कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करायला हवेत, या शब्दांत थोरातांनी पीयुष गोयल यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 

कुंभमेळा असो वा रमजान, कोरोना नियमांचे पालन अशक्य: अमित शाह

रेमडेसिविर इंजेक्शन्स राज्य सरकारला मिळायला हवी होती

राज्यात सध्या रेमडेसिविर इंजेक्शन्सचा तुटवडा आहे. आम्ही लोकांना मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. निर्यातबंदी झाल्यानंतर रेमडेसिविर इंजेक्शन्स एखाद्या पक्षाला नव्हे तर राज्य सरकारला मिळायला हवी होती, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी मदत करायला हवी होती. मात्र, ते फार्मा कंपनीच्या मालकासाठी पोलीस ठाण्यात गेले. ही गोष्ट पटली नाही, असे थोरात यांनी सांगितले. 

रेमडेसिवीरचा ‘गेम’डेसिवीर करू नका; रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारला टोला

दरम्यान, रेमडेसिवीरचा ‘गेम’डेसिवीर करू नका. देशात कोरोनाचा कहर रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी चांगले काम करत आहेत. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी, राज्यपालांशी संवाद साधत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मृत्युंना पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा खोटा आणि खोडसाळ आरोप राज्य सरकार करत आहे. महराष्ट्राच्या महाविकास आघाडीने दुतोंडी भूमिका घेऊ नये, अशी टीका केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी केली. 
 

Web Title: congress balasaheb thorat slams piyush goyal over his statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.