वसंत भोसलेकोल्हापूर, सांगली, सातारा हा दक्षिण महाराष्ट्र म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला. राष्ट्रवादीने त्याला तडे दिले आणि आपला गड निर्माण केला. तो आताही राखला, पण काँग्रेसला मोठा दणका बसला आहे. पृथ्वीराज चव्हाणांसह २६पैकी तीनच उमेदवार निवडून आले. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. भाजपाने सांगली जिल्ह्यात ४, तर शिवसेनेने कोल्हापूर जिल्ह्यात १०पैकी ६ जागा जिंकून काँग्रेसचा सफाया केला आहे. शिवसेनेला २६पैकी ८ ठिकाणी विजय मिळाला. भाजपाला ६ जागा मिळाल्या आहेत. म्हणजे २६पैकी १४ जागा जिंकून दोन्ही पक्षांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गडात मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादीने सातारा जिल्ह्यात ८पैकी ५ जागा जिंकल्या. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येकी २ जागा जिंकत गेल्या निवडणुकीतील यशापर्यंत राष्ट्रवादी पोहोचला. काँग्रेसने सांगलीत १, तर साताऱ्यात २ जागा जिंकल्या. कोल्हापूर जिल्ह्यात १०पैकी ६ उमेदवार मातब्बर असूनही सर्वांचा पराभव झाला. एक-दोन जागा मिळविणाऱ्या शिवसेनेने या वेळी मातब्बर, इतर पक्षातून घेतलेले उमेदवार उभे करून सर्वांत अधिक जागा जिंकल्या. खासदार राजू शेट्टी यांनी महायुतीच्या माध्यमातून मोठी हवा निर्माण केली होती, दक्षिण महाराष्ट्रात त्यांनी ७ जागा लढविल्या, पण एकाही ठिकाणी विजय मिळविता आला नाही.
काँग्रेसला मोठा दणका
By admin | Published: October 20, 2014 5:03 AM