काँग्रेसने फोडला भाजपाच्या ‘पापाचा घडा’; काँग्रेसच्या संघर्ष यात्रेत दहीहंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 03:09 AM2018-09-04T03:09:01+5:302018-09-04T03:09:22+5:30

केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या नेत्यांनी सोमवारी सकाळी क-हाडात भाजपाच्या पापाचा प्रतीकात्मक घडा फोडला. ‘या सरकारचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय,’ अशा घोषणांनी या वेळी परिसर दणाणून गेला.

Congress blames BJP for 'sinfulness'; Dahihandi during the Congress sangharsh yatra | काँग्रेसने फोडला भाजपाच्या ‘पापाचा घडा’; काँग्रेसच्या संघर्ष यात्रेत दहीहंडी

काँग्रेसने फोडला भाजपाच्या ‘पापाचा घडा’; काँग्रेसच्या संघर्ष यात्रेत दहीहंडी

Next

क-हाड (जि.सातारा) : केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या नेत्यांनी सोमवारी सकाळी क-हाडात भाजपाच्या पापाचा प्रतीकात्मक घडा फोडला. ‘या सरकारचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय,’ अशा घोषणांनी या वेळी परिसर दणाणून गेला.
काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा रविवारी रात्री कºहाडात मुक्कामी आली. सोमवारी सकाळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री सतेज पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार विश्वजीत कदम, आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे आदींनी एका चौकात श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधत भाजपाचा निषेध करणारी मटकी फोडली. संघर्ष यात्रेमुळे कºहाड शहरातील वातावरण काँग्रेसमय झाले होते. प्रारंभी राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला नेत्यांनी अभिवादन केले.

मराठा आरक्षणाबाबत काँग्रेस सकारात्मक
मराठा आरक्षणाबाबत काँग्रेस पहिल्यापासूनच सकारात्मक आहे. आघाडी सरकार असताना आम्ही आरक्षणाचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर आलेल्या भाजपा सरकारने हा प्रश्न प्रलंबित कसा राहील, हे पाहिले. धनगर समाजाच्या बाबतीतही केवळ गाजर दाखविण्याचे काम केले आहे. हे सरकार ‘फसणवीस सरकार’ आहे, अशी टीका खा. चव्हाण यांनी केली.

मराठा क्रांतीचे निवेदन : मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही. कºहाडात संघर्ष यात्रेच्या निमित्ताने आलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळ परिसरात याबाबतचे निवेदन मराठा क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी दिले. या वेळी ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

उंडाळकरांबाबतचा निर्णय पृथ्वीबाबांनीच घ्यावा
‘काँग्रेसचे बळ वाढविण्यासाठी नाराजांना बरोबर घेतलेच पाहिजे. त्यामुळे माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकरांच्या पक्ष प्रवेशाबाबत मी सकारात्मकच आहे. मात्र, याबाबतचा निर्णय उंडाळकरांचे जवळचे मित्र सुशीलकुमार शिंदे व पृथ्वीराज चव्हाण या दोघांनीच घ्यावा. माझी त्याला संमतीच आहे,’ असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Web Title: Congress blames BJP for 'sinfulness'; Dahihandi during the Congress sangharsh yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.