मुंबई - महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावर चर्चा झाली. मात्र तत्पूर्वी या बैठकीचं महाविकास आघाडीनेवंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पत्र पाठवून निमंत्रण पाठवले. त्या निमंत्रणानंतर पडद्यामागून बऱ्याच घडामोडी घडल्या. या बैठकीचं नाना पटोलेंच्या सहीचे पत्र आल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांना फोन केला. त्यात कॉन्फरन्स कॉलवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनीथला यांच्याशी प्रकाश आंबेडकरांचे बोलणं झाले. मात्र या संभाषणात वेगळीच माहिती समोर आली.
प्रभारी रमेश चेनीथला यांनी प्रकाश आंबेडकरांना फोनवर सांगितले की, महाराष्ट्रात आघाडीची बोलणी करण्याचे अधिकार काँग्रेसने बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण या दोन नेत्यांकडे दिलेले आहेत. पुढच्या वेळेला महाविकास आघाडीची जी बैठक होईल त्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकरांनी सहभागी व्हावं अशी विनंती चेनीथला यांनी केली. रमेश चेनीथला यांची ही विनंती प्रकाश आंबेडकर यांनी मान्य केली आहे. मात्र ती मान्य करतानाच प्रकाश रमेश चेनीथला यांना महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक परिस्थिती जी आहे त्याबद्दल अवगत करून दिली. परंतु चेनीथला यांच्या माहितीनुसार बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांना आघाडीत बोलणीचे अधिकार दिलेत मग नाना पटोलेंना कुठलेच अधिकार नाहीत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ओबीसी आणि मराठा बांधवांचा प्रश्न हा पेटलेला आहे. जरांगेचा आंदोलन असेल किंवा गरीब मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल यासंदर्भात रास्त आणि योग्य भूमिका घेणे आवश्यक असल्याच प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.रमेश चेनीथला यांनी सुद्धा ते मान्य केलं की हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आपण त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ओबीसी आरक्षण असेल किंवा मराठ्यांचा आत्ताचा पेटलेला प्रश्न असेल या संदर्भामध्ये काँग्रेसचा किंवा शिवसेनेचा तसा थेट संबंध आला नाही मात्र आम्ही त्या आंदोलनात सुरुवातीपासून आहोत, हा प्रश्न आमच्या जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे हा प्रश्न आणि या संदर्भातील भूमिका स्पष्ट केल्यावरच आपल्याला पुढे जाता येईल त्याशिवाय या ठिकाणी महाराष्ट्रातलं राजकारण करता येणार नाही. रमेश चेनीथला यांनी हेही मान्य केलं आहे. आगामी बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होईल असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.