बारामती : शेतकऱ्याला पिंजऱ्यात पोपट बनवुन काँग्रेसने ठेवले होते.त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडण्याचे काम मोदी सरकार करत आहेत .मात्र, शेतकऱ्याच्या जीवावर जगणारी बांडगुळ परत शेतकऱ्याला बंद करण्यासाठी धडपडत आहेत. यामध्ये काँग्रेस पाठोपाठ कम्युनिस्टांचा देखील समावेश आहे, अशी टीका शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
बारामती येथे खोत हे न्यायालयीन कामकाजासाठी मंगळवारी (दि २) आले होते.यावेळीअशी टीका शेतकरी नेते न्यायालयीन कामकाज पुर्ण झाल्यानंतर खोत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खोत पुढे म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 'लोक माझे सांगाती' या पुस्तकामध्ये मार्केट कमिटीच्या बाहेर शेतीमाल बाहेर विकता आला पाहिजे,असे नमुद केले आहे. बारामतीचा माझा भाजीपाला घेवुन मी मुंबई मार्केट कमिटीला गेलो होतो.तेव्हा तेथे आडत, हमाली से एवढे कट झाल्यावर मला सुध्दा येथे लुट असल्याचे वाटायला लागत,असे पवार यांनी पुस्तकात लिहिले आहे. ही गोष्ट खरी असल्याचे मला वाटले होते. मात्र, आता ते विरोधात बोलत आहेत.त्यामुळे याचा अर्थ सरळ आहे. साहेब आपला भाजीपाला घेवुन गेले नव्हते. तेवढे लबाड बोलले आहेत.ते लिहिलेले खरे असल्यास ते आत्मचरित्र हे कृषिचरित्र म्हणुन लागू करावे,अशी थेट मागणी खोत यांनी केली.
काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेला माझे चॅलेंज़ आहे. २००६ मध्ये करार शेतीचा कायदा काँग्रेसनेच मंजूर केला. करार शेतीचा खेळ महाराष्ट्राला बारामतीने दाखवला. बारामतीत कृषि प्रदर्शनात वेगवेगळ्या देशातुन आणल्याचे सांगतात. शेतीचा करार उगम बारामतीतुन होतो,या कायद्याची अंमलबजावणी बारामतीतुन होते, असा आरोप खोत यांनी केला.
तरच आम्ही तुम्हाला शेतकरी नेते म्हणु....
मार्केटच्या संचालकांना खोत यांनी वळुबैल संबोधले. तसेच त्यांना पोसण्यासाठी १ कोटी ४० लाख शेतकऱ्याचा बळी का देता,असा सवाल खोत यांनी केला. शेतकऱ्यासाठी काम करण्याचा दावा करता,मग शेतकऱ्याचे साखर कारखाने विकत का घेतले,२० किमीची दोन कारखान्यातील अट काढुन टाका,तरच आम्ही तुम्हाला शेतकरी नेते म्हणु. शेतकऱ्याला लुटायचा धंदा बंद करा,तरुण पिढी आता शिकलेली आहे,अशी टीका खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर केली.
सरकारवाद जोपासणारी माणसे दिल्लीला जमली... भविष्यकाळात रेशनव्यवस्था १०० टके संपुष्टात आणावी लागेल.यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. धान्याऐवजी महिन्याला त्या प्रमाणात रक्कम खातेदाराच्या खात्यावर वर्ग करा,त्यातुन बचत होणारी रक्कम सर्वसामान्यांच्या उपयोगी येईल. रोजगारवादी देश उभा करा.त्यामुळे प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल.मात्र,सरकारवाद जोपासणारी माणसे दिल्लीला जमली असल्याचा टोला खोत यांनी लगावला.