१५ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीशी युती करून काँग्रेस सत्ता स्थापणारताराराणी आघाडीची कडवी झुंज; १९ जागा जिंकल्याभाजपचा स्वप्नभंग, तरीही १३ जागांवर मिळविला विजयशिवसेनेचा मुखभंग; अवघ्या चार जागा जिंकण्यात यशकोल्हापूर : साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला हात देत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना साथ दिली आहे. महापालिका त्रिशंकू झाली असली तरी काँग्रेस २७ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष बनला. राष्ट्रवादीला १५ जागा मिळाल्याने हे दोन्ही पक्ष एकत्रित येऊन पुन्हा सत्ता स्थापन करणार, हे स्पष्ट झाले. कॉँग्रेसखालोखाल १९ जागा जिंकणाऱ्या ताराराणी आघाडीने या निवडणुकीत कडवी झुंज दिली आहे. १३ जागा जिंकणाऱ्या भाजपचे महापालिकेची सत्ता मिळविण्याचे स्वप्न भंग पावले आहे, तर अवघ्या चार जागा मिळविणाऱ्या शिवसेनेचा मुखभंग झाला आहे. तीन ठिकाणी अपक्ष विजयी झाले. या निवडणुकीत मतदारांना गृहीत धरणाऱ्या प्रस्थापितांना लोकांनी लाथाडले. आमदार महादेवराव महाडिक यांच्या सर्वपक्षीय राजकारणालाही लोकांनी ब्रेक लावला.महापालिकेच्या ८१ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना स्वबळावर लढत होती. भाजप व ताराराणी आघाडीने युती केली होती. विधानसभा निवडणुकीनंतर वर्षभरानंतर होणारी ही निवडणूक असल्याने विधानसभेवेळचे लोकमानस तसेच कायम आहे का, याचीही चाचणी म्हणून या लढतीकडे पाहिले जात होते. भाजपकडे स्वपक्षाच्या उमेदवारांची वानवा होती; अनेक प्रभागांत त्यांनी महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनाच संधी दिली. त्यातील काही गुन्हेगारीशी संबंधित, दोन नंबरवाले आहेत, अशी टीका प्रचारात झाली. त्याचाही फटका भाजपला बसला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५ जागा विजयी झाल्या; परंतु गेल्या निवडणुकीचा विचार करता त्यांना अकरा ठिकाणी अपयश आले. तगडे उमेदवार दिल्याने राष्ट्रवादीच पहिल्या क्रमांकावर राहील अशी हवा होती; परंतु प्रत्यक्षात मतदारांनी त्या पक्षाला तिसऱ्या स्थानावर ढकलले. आमदार हसन मुश्रीफ यांनी निकराची लढत देऊनही त्यांच्या पक्षाला माफक यश मिळाले. ताराराणी आघाडीच्या विजयासाठी आमदार महाडिक, आमदार अमल महाडिक, स्वरूप महाडिक आणि राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी कंबर कसली होती. त्यांना १९ जागा मिळाल्या, हे यश कमी नसले तरी महापालिकेची सत्ता काबीज करता आली नाही, हा त्यांचा पराभवच म्हटला पाहिजे. या निवडणुकीत शिवसेनेची मात्र बेअब्रू झाली. या पक्षाने सर्व ८१ जागा लढविल्या व चारच ठिकाणी त्यांच्या वाट्याला गुलाल आला. याचा अर्थ विधानसभेला विजय मिळाला तरी महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी पक्षाला अजून बराच पल्ला गाठावा लागेल, हाच या निकालाचा अर्थ आहे. (प्रतिनिधी)पक्षीय बलाबल२०१५काँग्रेस- २७राष्ट्रवादी- १५भाजप- १३ ताराराणी आघाडी- १९शिवसेना- ०४अपक्ष- ०३एकूण- ८१२०१०काँग्रेस- ३१राष्ट्रवादी- २५भाजप- ०३ शिवसेना- ०४जनसुराज्य- ०४अपक्ष- ०९शाहू आघाडी- ०१एकूण- ७७(ताराराणी आघाडी रिंगणात नव्हती.)काँग्रेसवर जनतेने विश्वास दाखविला आहे. जनतेचा कौल आम्ही आदरपूर्वक स्वीकारतो. महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी काही जागा कमी मिळाल्या, परंतु आम्ही राष्ट्रवादीबरोबर आघाडी करून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत असून, तशी आजच हसन मुश्रीफ यांच्याशी माझी सकारात्मक चर्चा झाली. लवकरच निर्णय घेऊ. - सतेज पाटील, माजी मंत्री,काँग्रेसमहापालिका निवडणुकीत जनतेने भाजपला भरभरून कौल दिला. तीन नगरसेवकांपासून या निवडणुकीत १३ जागा भाजपने जिंकून चौपट यश मिळविले आहे. त्याबद्दल कोल्हापूरच्या जनतेचा जाहीर आभारी आहे. थोड्याशा फरकाने सत्तेपासून दूर राहिलो असलो तरी आम्ही प्रबळ ‘विरोधी पक्ष’ म्हणून काम करू. - चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस ज्या ताकदीने निवडणुकीत उतरली होती, त्यामुळे चांगल्या जागा मिळतील अशी अपेक्षा होती; पण अपेक्षाभंग झाला. आम्हाला फाजील आत्मविश्वास नडला. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. आगामी पाच वर्षे कोल्हापूरच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू. - हसन मुश्रीफ, आमदारजनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. विरोधकांनी छुपी युती केली. त्यातच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी ताराराणी-भाजप महायुतीलाच लक्ष्य केल्यामुळे आम्हाला अपेक्षित यश आले नाही; पण आम्ही विरोधी बाकांवर बसून सक्षमपणे कामकाज करू. - स्वरूप महादेवराव महाडिक, अध्यक्ष, ताराराणी आघाडी पक्ष निवडणुकीत विरोधी उमेदवारांकडून झालेल्या पैशाच्या वारेमाप वापरापुढे आमचे शिवसैनिक फिके पडले. आम्हाला जनतेचा कौल मान्य आहे. मतदारांचा आम्ही सन्मान राखतो. झालेल्या चुका सुधारून पुन्हा संघटनात्मक बांधणी केली जाईल.- राजेश क्षीरसागर, आमदार प्रमुख विजयी : शारंगधर देशमुख, मुरलीधर जाधव, संजय मोहिते, महेश सावंत, सत्यजित कदम, डॉ. संदीप नेजदार, सुनील पाटील, किरण शिराळे, संभाजी जाधव, भूपाल शेटे, राजाराम गायकवाड.प्रमुख पराभूत : नंदकुमार वळंजू, उदय साळोखे, जयश्री सोनवणे, प्रकाश नाईकनवरे, हरिदास सोनवणे, राजू लाटकर, सुनील मोदी, प्रकाश मोहिते.यवलुजे नव्या ‘महापौर’ ?राष्ट्रवादीच्या पाठबळावर काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहे. महापौरपदासाठी स्वाती यवलुजे, अश्विनी रामाणे व दीपा मगदूम या महापौरपदाच्या स्पर्धेत आहेत. मात्र, बावड्याने काँग्रेसला भरभरून साथ दिल्याने यवलुजे प्रबळ दावेदार आहेत.
काँग्रेसला हात, बंटींना साथ !
By admin | Published: November 03, 2015 1:16 AM