काँग्रेसला मोठा इतिहास, पण आता त्यांना भूगोल ​​​​​​​नाही, तो त्यांनी वाढवायला हवा- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 07:40 AM2022-03-26T07:40:41+5:302022-03-26T07:41:43+5:30

मधु मंगेश कर्णिक यांच्या ‘प्राप्तकाल’ कादंबरीचे प्रकाशन

Congress has a long history, but now they don't have geography says shiv sena mp Sanjay Raut | काँग्रेसला मोठा इतिहास, पण आता त्यांना भूगोल ​​​​​​​नाही, तो त्यांनी वाढवायला हवा- संजय राऊत

काँग्रेसला मोठा इतिहास, पण आता त्यांना भूगोल ​​​​​​​नाही, तो त्यांनी वाढवायला हवा- संजय राऊत

googlenewsNext

ठाणे : काँग्रेस केवळ कादंबरीतच आहे, असे नाही तर काँग्रेसने भौगोलिकदृष्ट्या विस्तारले पाहिजे. स्वत:ची ताकद वाढविली पाहिजे, तरच आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला सक्षम पर्याय उभा राहू शकतो, असे मत ज्येष्ठ पत्रकार तथा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी व्यक्त केले. आगामी काळात लोकसभेसह सर्वच निवडणुका भाजपला सोप्या राहणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

 पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या ‘प्राप्तकाल’ या कादंबरीचे प्रकाशन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गडकरी रंगायतन नाट्यगृहात पार पडले. त्याप्रसंगी त्यांनी हा दावा केला. कार्यक्रमात भालचंद्र मुणगेकर यांना उद्देशून काँग्रेस आता कादंबरीतच राहिल्याचे वक्तव्य केले हाेते, त्यावर कार्यक्रमानंतर पत्रकारांपुढे राऊत यांनी ही भूमिका मांडली. 

ते म्हणाले, काँग्रेसला एक मोठा इतिहास आहे. मात्र, त्यांना केवळ भूगोल राहिलेला नसून तो त्यांनी वाढविला पाहिजे. उत्तर प्रदेश किंवा इतर राज्यात निकाल पाहता काँग्रेसला या देशामध्ये स्वत:ची ताकद वाढवावी लागेल तरच २०२४ मध्ये काँग्रेस समर्थ पर्याय देऊ शकतो. प्रकाशन कार्यक्रमात झालेल्या परिसंवादामध्ये त्यांनी शाखा आरएसएस आणि शिवसेनेच्याही वाढत आहेत, असे म्हटले होते. त्यावर भाष्य करताना ते म्हणाले, शिवसेनेची शाखा आपोआप भरते. संघासाठी माणसे तयार केली जातात तसेच शिवसेनेच्या शाखेमार्फत समाजकार्य केले जाते. लोकांची कामेही होत आहेत, असाही दावाही केला. 

यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, माजी कुलगुरू तसेच  कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर, माध्यम सल्लागार जयू भाटकर, नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे आदी उपस्थित होते. यावेळी प्राप्तकाल कादंबरीच्या अनुषंगाने लेखक तथा ज्येष्ठ पत्रकार संजीव लाटकर यांनी संवाद साधला.  

भाजपला भीती
दिल्लीतील निवडणुका या भाजपने लांबणीवर टाकल्याचा आरोप ‘आप’ने केल्याबाबत राऊत म्हणाले, संपूर्ण देशातच महापालिकेच्याच नव्हे तर सर्वच निवडणुका या भाजपला सोप्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यात एक भीती निर्माण झालेली आहे. 

Web Title: Congress has a long history, but now they don't have geography says shiv sena mp Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.