शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

काँग्रेसला मोठा इतिहास, पण आता त्यांना भूगोल ​​​​​​​नाही, तो त्यांनी वाढवायला हवा- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 7:40 AM

मधु मंगेश कर्णिक यांच्या ‘प्राप्तकाल’ कादंबरीचे प्रकाशन

ठाणे : काँग्रेस केवळ कादंबरीतच आहे, असे नाही तर काँग्रेसने भौगोलिकदृष्ट्या विस्तारले पाहिजे. स्वत:ची ताकद वाढविली पाहिजे, तरच आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला सक्षम पर्याय उभा राहू शकतो, असे मत ज्येष्ठ पत्रकार तथा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी व्यक्त केले. आगामी काळात लोकसभेसह सर्वच निवडणुका भाजपला सोप्या राहणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या ‘प्राप्तकाल’ या कादंबरीचे प्रकाशन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गडकरी रंगायतन नाट्यगृहात पार पडले. त्याप्रसंगी त्यांनी हा दावा केला. कार्यक्रमात भालचंद्र मुणगेकर यांना उद्देशून काँग्रेस आता कादंबरीतच राहिल्याचे वक्तव्य केले हाेते, त्यावर कार्यक्रमानंतर पत्रकारांपुढे राऊत यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले, काँग्रेसला एक मोठा इतिहास आहे. मात्र, त्यांना केवळ भूगोल राहिलेला नसून तो त्यांनी वाढविला पाहिजे. उत्तर प्रदेश किंवा इतर राज्यात निकाल पाहता काँग्रेसला या देशामध्ये स्वत:ची ताकद वाढवावी लागेल तरच २०२४ मध्ये काँग्रेस समर्थ पर्याय देऊ शकतो. प्रकाशन कार्यक्रमात झालेल्या परिसंवादामध्ये त्यांनी शाखा आरएसएस आणि शिवसेनेच्याही वाढत आहेत, असे म्हटले होते. त्यावर भाष्य करताना ते म्हणाले, शिवसेनेची शाखा आपोआप भरते. संघासाठी माणसे तयार केली जातात तसेच शिवसेनेच्या शाखेमार्फत समाजकार्य केले जाते. लोकांची कामेही होत आहेत, असाही दावाही केला. यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, माजी कुलगुरू तसेच  कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर, माध्यम सल्लागार जयू भाटकर, नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे आदी उपस्थित होते. यावेळी प्राप्तकाल कादंबरीच्या अनुषंगाने लेखक तथा ज्येष्ठ पत्रकार संजीव लाटकर यांनी संवाद साधला.  भाजपला भीतीदिल्लीतील निवडणुका या भाजपने लांबणीवर टाकल्याचा आरोप ‘आप’ने केल्याबाबत राऊत म्हणाले, संपूर्ण देशातच महापालिकेच्याच नव्हे तर सर्वच निवडणुका या भाजपला सोप्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यात एक भीती निर्माण झालेली आहे. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा