मुंबई - काँग्रेस पक्ष वैयक्तिक मालकीचा नाही. निवडणूक आयोगाकडे घटनेची नोंद आहे. गांधी कुटुंबाने दिले. त्यात समाधान मानले पाहिजे. ही मुघल सलतन आहे का? लोकशाहीपद्धतीने नेमणुका होत नाही याचा गांभीर्याने विचार करणार आहोत का? सोनिया गांधी होत्या विजय मिळत गेला. आमची चूक झाली याआधी आम्ही हे बोलायला हवं होतं. निवडणूक घेऊन जे निवडून येईल ते मान्य केले पाहिजे. एकाच कुटुंबातील जास्त नको. मग राहुल गांधी कोणत्या कुटुंबातील आहेत. काँग्रेस पक्षाला वाचवायचं असेल निवडणूक घ्यायला हवी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
गुलाब नबी आझाद यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर आता विविध प्रतिक्रिया येऊ लागल्यात. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, गुलाब नबी आझाद यांच्या राजीनाम्याचं दु:ख आहे. अनेक वर्ष ते काँग्रेससोबत होते. पक्ष संघटनेत त्यांनी अनेक वर्ष काम केले आहे. या नेत्याला पक्ष सोडून जावं लागतं तेव्हा वाईट वाटतं. कोविड काळात काँग्रेस अध्यक्षांशी आमची भेट होत नव्हती. आम्ही गोपनीय पत्र सोनिया गांधींना लिहिलं. दुर्दैवाने हे पत्र माध्यमांमध्ये लिक झाले. मोदी-शाह यांच्याविरोधात लढण्यासाठी काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा अशी मागणी आम्ही केली होती. राहुल गांधी तयार असतील तर ठीक अन्यथा निवडणुका घेऊन अध्यक्षांची नेमणूक करावी असं आम्ही म्हटलं होते. काँग्रेसच्या पराभवाची कारणे काय याचं आत्मचिंतन करण्याची मागणी होती. काँग्रेसच्या संविधानात्मक रचनेनुसार पक्षांतर्गत निवडणूक होणे गरजेचे आहे. ते झाले नाही असं चव्हाणांनी म्हटलं.
डिसेंबरमध्ये आम्ही सोनिया गांधींसोबत ५ तास चर्चा केली. त्यात चिंतन शिबीर, निवडणुका घेण्याचं मान्य केले. परंतु त्यालाही बराच वेळ झाला. केरळ, आसाम, यूपी, पंजाबच्या निवडणुकीत पराभव झाला. पंजाबचा मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय कुणी घेतला? चिंतन नको, नवसंकल्प शिबीर घेतले. राहुल गांधी अध्यक्ष असतील तर काय हरकत नाही. परंतु ते निवडणुकीतून समोर यावं. जी-२३ लोकांनी जे पत्र दिले ते गोपनीय पत्र लीक झाले. त्यानंतर राजकारण सुरू झाले. आमची बंडखोरी करण्याचा विषय नव्हता. त्यानंतर ज्येष्ठ नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू झाला असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.