नवी दिल्ली : निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आल्यामुळे वेळ न दवडता राष्ट्रवादीसोबत जागावाटपाला अंतिम रूप दिले जावे, असे काँग्रेसला वाटते. आघाडी न करता एकटय़ाने निवडणूक लढण्याची वेळ आलीच तर आयत्या वेळी धावपळ होऊ नये, यासाठी काँग्रेसच्या छाननी समितीने 27क् उमेदवारांची नावे तयार ठेवली आहेत, असेही सूत्रंचे म्हणणो आहे.
15 आमदारांना डच्चू?
शनिवारी ठरलेल्या यादीनुसार मुंबई, मराठवाडा आणि विदर्भातील काही विद्यमान आमदारांना डच्चू दिला जाईल; पण त्यांची संख्या 15 हून जास्त असणार नाही, असे सूत्रंनी सांगितले. लोकसभेच्या वेळी झाले तसे तिकीट नाकारले जाणा:यांना भाजपा-शिवसेनेकडे उडी मारण्याची संधी मिळू नये यासाठी पक्षश्रेष्ठी सावध पावले टाकत असून, वरिष्ठ पक्षनेत्यांनी ज्यांच्या कामगिरीविषयी असमाधानकारक अहवाल दिले आहेत, अशांनाच उमेदवारी नाकारली जाईल.
ज्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली, पण यश मिळाले नाही अशांना विधानसभेची उमेदवारी न देण्याचे सूत्रही श्रेष्ठींनी ठरविल्याचे समजते. याचा सुगावा लागल्याने राज्य काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणो यांनी आपले धाकटे चिरंजीव नितेश यांना कणकवलीमधून तर स्वत:ला कुडाळमधून उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे सूत्रंचे म्हणणो अहे. राणो यांचे ज्येष्ठ चिरंजीव रत्नागिरीमधून लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते.
प्रचारप्रमुख नारायण राणो यांच्याप्रमाणोच इतरही काही नेत्यांनी आपल्या मुलाबाळांच्या तिकिटांसाठी प्रयत्न सुरू ठेवल्याचे कळते. पण अशा उमेदवारींवर केंद्रीय निवडणूक समिती नंतर निर्णय घेईल.
मंगळवार्पयत
अंतिम निर्णय ?
काँग्रेस नेतृत्वाने उमेदवारांची निवड करताना अतिशय सावधगिरी बाळगली आहे. निवडणूक निकालाचा विचार करीत सशक्त उमेदवारांवर
भर देण्यात आला. भाजपा- शिवसेना महायुतीचा घोळ
सुरू असताना कोणत्याही किमतीत सोमवार-मंगळवारी जागावाटपाला अंतिम
रूप देण्यासाठी
काँग्रेस आग्रही
आहे.