राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 08:31 PM2024-05-28T20:31:14+5:302024-05-28T20:31:34+5:30

Maharashtra News: राज्यातील दुष्काळग्रस्त भागाला भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागनिहाय दुष्काळ पाहणी समित्यांची स्थापन केली असून या समित्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून विभागीय आयुक्तांना व प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करणार आहेत.

Congress is aggressive on the issue of drought in the Maharashtra, formation of department wise committees to monitor the situation | राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

मुंबई - राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे, पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्यांची मोठी समस्या असून रोजगारही मिळत नाहीत. राज्यातील महाभ्रष्टयुती सरकारला दुष्काळाची चिंता नाही. जनता दुष्काळाने होरपळ असताना महायुती राजकीय साठमारीत व्यस्त आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त भागाला भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागनिहाय दुष्काळ पाहणी समित्यांची स्थापन केली असून या समित्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून विभागीय आयुक्तांना व प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करणार आहेत.

प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार व प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेवरून विभागवार जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मराठवाडा विभागाच्या समितीचे प्रमुख आहेत. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात ह्यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र विभागाची जबाबदारी दिली आहे. नागपूर विभागाच्या समितीचे प्रमुख विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहेत. पश्चिम महाराष्ट्राचे समिती प्रमुख माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. कोकण विभाग समितीचे प्रमुख प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान आहेत तर अमरावती विभाग समिती प्रमुख माजी मंत्री यशोमती ठाकूर आहेत. या समितीत राज्यातील प्रमुख नेते, आमदार, माजी मंत्री, पदाधिकारी यांचाही समावेश आहे. ही समिती दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेणार असून विभागीय आयुक्तांना निवेदन देणार आहेत तसेच प्रदेश काँग्रेसला आपला अहवाल देणार आहेत.
 

Web Title: Congress is aggressive on the issue of drought in the Maharashtra, formation of department wise committees to monitor the situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.