Maharashtra Politics: “भारत जोडो यात्रा ‘मन की बात’ची यात्रा नाही, जनतेच्या चिंतेची यात्रा!”; मोदी सरकारवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 03:17 PM2022-11-09T15:17:15+5:302022-11-09T15:18:46+5:30

Maharashtra News: काँग्रेसचे समर्थकच नाही तर विरोधकही भारत जोडो पदयात्रेला पाठिंबा देत आहेत, असे सांगत काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली.

congress jairam ramesh replied central pm modi govt over criticised rahul gandhi bharat jodo yatra | Maharashtra Politics: “भारत जोडो यात्रा ‘मन की बात’ची यात्रा नाही, जनतेच्या चिंतेची यात्रा!”; मोदी सरकारवर घणाघात

Maharashtra Politics: “भारत जोडो यात्रा ‘मन की बात’ची यात्रा नाही, जनतेच्या चिंतेची यात्रा!”; मोदी सरकारवर घणाघात

googlenewsNext

Maharashtra Politics:भारत जोडो यात्रा ही राजकीय यात्रा नसून राजकीय फायद्या-तोट्यासाठीही नाही. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून, पहिल्या दिवसांपासून विरोधक टीका करत आहेत. त्याला काँग्रेस महत्व देत नाही. पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस प्रचंड आहे. ही यात्रा ‘मन की बात’ची यात्रा नसून ‘जनतेच्या चिंते’ची यात्रा आहे, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी सांगितले. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात आली आहे. या यात्रेला अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही प्रचंड प्रतिसाद लाभत असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जयराम रमेश बोलत होते. 

कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत निघालेली ही पदयात्रा देशातील विदारक परिस्थिती जनतेला अवगत करण्यासाठी आहे. देशात सध्या असलेली आर्थिक विषमता, समाजिक धृवीकरण व राजकीय हुकूमशाहीच्या विरोधात आहे. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची घसरण यासाह सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ही पदयात्रा आहे. राहुलजी गांधी दररोज शेतकरी, तरुण, महिला, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, छोटे व्यापारी यांच्या समस्या, व्यथा जाणून घेत आहेत, असे जयराम रमेश म्हणाले. 

काँग्रेसचे समर्थकच नाही तर विरोधकही या पदयात्रेला पाठिंबा देत आहेत

महाराष्ट्रात पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ६३ दिवस, ६ राज्ये व २७ जिल्ह्यातून ही पदयात्रा मार्गक्रमण करत पदयात्रेचे अर्धे अंतर पार केलेले आहे. पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद पक्ष संघटना बळकट होण्यास मदत होत आहे. लोकांमध्ये राहुलजी गांधी यांच्या पदयात्रेबद्दल मोठा उत्साह दिसून येत आहे. काँग्रेसचे समर्थकच नाही तर विरोधकही या पदयात्रेला पाठिंबा देत आहेत. भारतीय जनता पक्ष व आरएसएसच्या विचारधारेच्या विरोधात देशभर एकच पक्ष सामना करू शकतो तो म्हणजे काँग्रेस पक्ष आणि त्यामुळे जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, असे जयराम रमेश यांनी सांगितले. 

भ्रष्टाचारी लोकांनाच भ्रष्टाचार दिसतो

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारत जोडो यात्रा निघाल्यापासून भारतीय जनता पक्ष टीका करत गैरसमज पसरवण्याचे काम करत आहे पण त्याकडे फारसे लक्ष देण्याचे गरज नाही. ‘भ्रष्टाचारी लोकांनाच भ्रष्टाचार दिसतो’ असा प्रतिटोला त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला. पदयात्रेत तरुणांची संख्या लक्षणीय आहे. राहुल गांधी या पदयात्रेच्या माध्यमातून जनतेच्या भावना समजून घेत आहेत. ही मुव्हमेंट आहे इव्हेंट नाही, असा पलटवार नाना पटोले यांनी केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: congress jairam ramesh replied central pm modi govt over criticised rahul gandhi bharat jodo yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.