शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

"काकांनी निवृत्त होण्याची वेळ"; आशिष देशमुखांचा गृहमंत्र्यांना घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 1:17 PM

विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपची साथ सोडत आशिष देशमुखांनी धरला होता काँग्रेसचा हात

ठळक मुद्देयापूर्वी भाजपत असताना आशिष देशमुखांनी केला होता अनिल देशमुखांचा पराभववेगळ्या विदर्भाची मागणी करत आशिष देशमुखांनी सोडला होत भाजपचा हात

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता निवृत्त होण्याची वेळ आली आहे, असं म्हणत त्यांचे पुतणे आशिष देशमुख यांनी घरचा आहेर दिला. "गृहमंत्री हे आपल्या मतदारसंघातून गायब आहेत. गेल्या सव्वा वर्षांमध्ये त्यांच्या मतदारसंघात कोणतीही कामंदेखील झालेली नाहीत. त्यामुळे मी पुन्हा सक्रिय झालो पाहिजे अशी जनतेची आणि कार्यकर्त्यांची मागणी होती. त्यामुळे सामाजिक कार्यक्रम मी आयोजित करत आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी माझा हातभार लागावा हीच एक इच्छा आहे," अशी प्रतिक्रिया आशिष देशमुख यांनी दिली. "अनिल देशमुख हे औरंगाबादमध्ये कोणाकोणासोबत दिसतायत हे ठाऊक आहे. त्यांनी याबद्दल स्पष्टीकरणही दिलं असेल. परंतु त्यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी आहे," असं आशिष देशमुख म्हणाले. राजकारणाशी माझ्या कार्यक्रमाचा संबंध नसला तरी खऱ्या अर्थानं पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग या वर्षात चालू होण्याची चिन्ह नाहीत. तसंच आमच्या या मतदारसंघात जवळपास ९ हजार विद्यार्थी गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून शिक्षणापासून दूर आहे. ते ड्रॉप आऊट होण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणातून या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक, सामाजिक आणि भावनिक नुकसान होत असल्याचं दिसत आहे आणि हे भरून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. "राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सर्व मतदार संघात फिरत आहेत. मग ते काँग्रेसचे असो किंवा शिवसेनेचे असो. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याची संधी आहे. आम्ही देशील तोच प्रयत्न करतोय. येत्या काळात काँग्रेस हा पक्षदेखील स्वबळावर राज्यात सत्तेत येईल," असा विश्वास आशिष देशमुख यांनी व्यक्त केला. प्रत्येक व्यक्ती हा निवृत्त होत असतो आता अनिल देशमुख यांची ही वेळ आली असल्याची टीका आशिष देशमुख यांनी केली.कोण आहेत आशिष देशमुख ?आशिष देशमुख हे नागपुरातील काटोल विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. परंतु २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकांपूर्वी  शिष देशमुख यांनी भाजपाचा हात सोडत काँग्रेसचा हात धरला होता. भाजपत असताना त्यांनी आपले काका अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. परंतु वेगळ्या विदर्भाची मागणी करत आशिष देशमुख यांनी २०१८ मध्ये भाजपला रामराम ठोकला. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखAshish Deshmukhआशीष देशमुखBJPभाजपाcongressकाँग्रेसnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्रJayant Patilजयंत पाटीलShiv Senaशिवसेना