मोदी सरकारच्या बहिरेपणावर इलाज करणे गरजेचे: बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 03:01 PM2021-03-01T15:01:30+5:302021-03-01T15:04:03+5:30

पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ, गॅसच्या वाढलेल्या किमती याला विरोध दर्शवण्यासाठी नाना पटोले यांच्यासह विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) तसेच काँग्रेस मंत्री व आमदारांनी सायकलवरून प्रवास करत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधान भवनात पोहोचले. यावेळी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करताना इंधन दरवाढ मागे घ्यावी, या मागणीचा पुनरुच्चार केला.

congress leader balasaheb thorat demands modi govt should withdraw fuel price hike | मोदी सरकारच्या बहिरेपणावर इलाज करणे गरजेचे: बाळासाहेब थोरात

मोदी सरकारच्या बहिरेपणावर इलाज करणे गरजेचे: बाळासाहेब थोरात

Next
ठळक मुद्देजनतेला अन्यायकारक पद्धतीने लुटले जातेय - बाळासाहेब थोरातर्वी भाजप नेते इंधन दरवाढीवरून आरडाओरडा करत होते - थोरातइंधन दरवाढ मागे घेण्याची थोरातांची मागणी

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ, गॅसच्या वाढलेल्या किमती याला विरोध दर्शवण्यासाठी नाना पटोले यांच्यासह विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) तसेच काँग्रेस मंत्री व आमदारांनी सायकलवरून प्रवास करत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधान भवनात पोहोचले. यावेळी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करताना इंधन दरवाढ मागे घ्यावी, या मागणीचा पुनरुच्चार केला. (congress leader balasaheb thorat demands modi govt should withdraw fuel price hike)

पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसमध्ये प्रचंड दरवाढ करून केंद्रातील मोदी सरकारने जनतेचे जगणे मुश्कील केले आहे, असा आरोप काँग्रेसकडून यावेळी करण्यात आला. इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी काँग्रेसचे सर्व मंत्री, आमदार आणि नेत्यांनी मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. 

जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणारे मोदी सरकार लुटारू; नाना पटोलेंची टीका

जनतेला अन्यायकारक पद्धतीने लुटले जातेय

सन २०१४ पूर्वी भाजप नेते इंधन दरवाढीवरून आरडाओरडा करत होते. परंतु, तेच नेते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढ करून जनतेची लूट करत आहेत. दररोज इंधनाचे दर वाढत आहेत. जनतेच्या खिशातील पैसे अन्यायकारक पद्धतीने लुटले जात आहेत. मोदी सरकारला जनतेचा आवाज ऐकू येत नाही, त्यांच्या बहिरेपणावर इलाज करणे गरजेचे आहे, असा हल्लाबोल बाळासाहेब थोरात यांनी केला. आम्ही सायकल रॅली काढून मोदी सरकारला इंधन दरवाढ मागे घ्या, हे ठणकावून सांगितले आहे. जनतेच्या वेदना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने याची दखल घ्यावी, अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी यावेळी दिला.

केंद्रातील मोदी सरकार लुटारू 

पेट्रोल आणि डिझेलवर अवाजवी करवाढ करून दिवसाढवळ्या जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणारे केंद्रातील भाजपचे सरकार लुटारू आहे, अशी जोरदार टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. जनतेमध्ये या महागाईविरोधात प्रचंड असंतोष असून, मोदी सरकारने निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. केंद्र सरकारने ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. 

Web Title: congress leader balasaheb thorat demands modi govt should withdraw fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.