विखेंच एकच लक्ष; आघाडीतील पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 02:47 PM2019-07-14T14:47:06+5:302019-07-14T14:51:00+5:30

काँग्रेसमध्ये नाराज असलेले माजी आमदार अब्दुल सत्तार यान सुद्धा भाजपमध्ये घेण्याचे प्रयत्न झाला, यात सुद्धा विखेंची मोठी खेळी होती.

congress Leader Contact vikhe patil | विखेंच एकच लक्ष; आघाडीतील पक्ष

विखेंच एकच लक्ष; आघाडीतील पक्ष

Next

मुंबई - लोकसभा निवडणुकीत खासदार सुजय विखे यांना आघाडीकडून उमदेवारी देण्यात आली नसल्याने नाराज असलेले गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. लगेचच त्यांना गृहनिर्माण मंत्रीपद सुद्धा मिळाले. शनिवारी तुळजापुरात देव दर्शनला आलेल्या विखेंनी पुन्हा खळबळजनक दावा केला आहे, अनेक जुने मित्र भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. त्यामुळे आघाडीमध्ये असलेल्या पक्षातील लोकांचा भाजपप्रवेश करण्याचा एकमेव लक्ष विखेंनी ठरवले असल्याचे बोलले जात आहे.

भाजपमध्ये जाताच विखेंनी जुन्या पक्षातील सहकाऱ्यांना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक जण माझ्या संपर्कात असल्याचा दावा सुद्धा त्यांच्याकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. विशेष म्हणजे विखे शनिवारी पुन्हा यावर बोलताना म्हणाले की, अनेक जुने मित्र भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेसमधील कोणते नेते भाजपच्या गळाला लागणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

काँग्रेसमध्ये नाराज असलेले माजी आमदार अब्दुल सत्तार यान सुद्धा भाजपमध्ये घेण्याचे प्रयत्न झाला, यात सुद्धा विखेंची मोठी खेळी होती. मात्र स्थ्यानिक भाजप नेत्यांनी केलेल्या विरोधानंतर सत्तारांना वेटिंग वर ठेवण्यात आले. विखेंचा काँग्रेसमध्ये चांगला दबदबा होता. त्यांना मानणारा एक वर्ग सुद्धा होता. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका लक्षात घेत विखेंकडून काँग्रेसमधील नेत्यांना फोडून मोठी खेळी करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: congress Leader Contact vikhe patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.