काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे. पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर, डॉक्टरांनी त्वरीत औषधोपचार सुरू केले. शनिवारी दिवसभरात सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कोरोनानंतर आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात देखील केली होती. पण, सातव यांना 'सायटोमेगँलोव्हायरस' या नव्या विषाणूची लागण झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारीच सांगितले होते. दरम्यान, यानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या."आज माझ्यासाठी, तमाम कॉंग्रेसच्या कार्यकर्ता साठी काळाचा दिवस. माझा मित्र, माझा भाऊ राजीव सातव आज आमच्यात नाही. भावपूर्ण श्रद्धांजली. काय बोलाव काय लिहाव काही कळत नाही, ही हाणी कधीही न भरून निघणारी आहे. अलविदा मेरे दोस्त!," असं म्हणत सातव यांच्या निधनानंतर नाना पटोले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
"काय बोलावं, काय लिहाव काही कळत नाही; कधीही न भरून निघणारी हानी"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 11:01 AM
Rajeev Satav : सातव यांच्या निधनानंतर नाना पटोलेंनी व्यक्त केलं दु:ख
ठळक मुद्देही कधीही भरुन न निघणारी हानी असल्याचं म्हणत पटोले यांनी व्यक्त केलं दु:खआज पहाटे सातव यांचं झालं निधन