गिरीश महाजन फार लहान आहेत, त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची गरज नाही; नाना पटोलेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 06:48 PM2021-02-22T18:48:45+5:302021-02-22T18:52:32+5:30

बॉलिवूडमधील बिग बी अमिताभ बच्चन आणि खिलाडी अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण होऊ देणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते. त्यावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. भाजपकडून या विधानावर सडकून टीका केली जात असताना नाना पटोले हेदेखील जशास तसा पलटवार करताना दिसत आहेत. या प्रकरणी गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत नाना पटोले यांनी त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची गरज नाही, असा टोला लगावला आहे.

congress leader nana patole criticised bjp leader girish mahajan | गिरीश महाजन फार लहान आहेत, त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची गरज नाही; नाना पटोलेंचा टोला

गिरीश महाजन फार लहान आहेत, त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची गरज नाही; नाना पटोलेंचा टोला

Next
ठळक मुद्देनाना पटोले यांचा गिरीश महाजन यांच्यावर पलटवारभारतमातेला विकण्याची सुरुवात भाजपने केलीय - नाना पटोलेभाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच

भंडारा : बॉलिवूडमधील बिग बी अमिताभ बच्चन आणि खिलाडी अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण होऊ देणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते. त्यावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. भाजपकडून या विधानावर सडकून टीका केली जात असताना नाना पटोले हेदेखील जशास तसा पलटवार करताना दिसत आहेत. या प्रकरणी गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत नाना पटोले यांनी त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची गरज नाही, असा टोला लगावला आहे. (congress leader nana patole criticised bjp leader girish mahajan)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाना पटोले यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. भारतमातेच्या नावावर भाजप मोठा झाला आहे. त्याच भारतमातेला विकण्याची सुरुवात भाजपने केली आहे. गिरीज महाजन हे लहान आहेत. त्यांच्या वक्तव्यावर काही बोलण्याची गरज नाही, असे नाना पटोले यांनी सांगितले.

ठाकरे सरकारमधील नेत्यांना झालेला कोरोना खरा आहे की राजकीय; नितेश राणेंचा खोचक सवाल

इंधनदरवाढीवरून काँग्रेस आक्रमक

इंधन दरवाढ, शेकऱ्यांचे प्रश्न यावरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र, आता त्यांनाही विसर पडल्याने भविष्यात काँग्रेस अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रिकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही तसेच त्यांचे चित्रपटाचे प्रदर्शनही होऊ देणार नाही, असे नाना पटोले म्हणाले होते.

दरम्यान, नाना पटोले आमचे चांगले मित्र आहेत. त्यांनी बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. हिंदी मराठी चित्रपटसृष्टी ही मुंबईची शान आहे. सिने उद्योग हा मुंबईतील महत्वाचा उद्योग आहे. या उद्योगात अशी बाधा आणणे योग्य नाही. लोकशाहीत अशी धमकी देणे चुकीचे आहे. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण बंद पडण्याचा प्रयत्न केला तर वेळ पडली तर रिपब्लिकन पक्षाचे कर्तकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करतील, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला. 

Web Title: congress leader nana patole criticised bjp leader girish mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.