नाना पटोले यांनी सांगितला GDP चा नेमका अर्थ; मोदी सरकारवर केली टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 03:02 PM2021-03-02T15:02:49+5:302021-03-02T15:05:41+5:30
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभा सभागृहात चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली मते मांडल्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बोलताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. खासदार मोहन डेलकर आत्महत्या, कोरोना, इंधन दरवाढ आदी मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभा सभागृहात चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली मते मांडल्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बोलताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. खासदार मोहन डेलकर आत्महत्या, कोरोना, इंधन दरवाढ आदी मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. (congress leader nana patole criticized central government on various issues at maharashtra legislation)
खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करत हे प्रकरण गंभीर असून, याची योग्य पद्धतीने चौकशी व्हावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. कोरोना काळात राज्य सरकारने चांगले काम केले, असे सांगत लॉकडाऊनसाठी सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका नाना पटोले यांनी केली. यावेळी बोलताना राज्यपालांच्या अभिभाषणाचे स्वागत करताना नाना पटोले यांनी राज्य सरकारने अनेक चांगल्या गोष्टी केल्याचे ते म्हणाले.
पंकजा मुंडे यांची मागणी योग्य, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे: प्रवीण दरेकर
केंद्राचा GDP म्हणजे नेमके काय?
इंधन दरवाढीला केवळ केंद्र सरकारच जबाबदार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेले जीडीपीचे आकडे चुकीचे आहेत, असा दावा नाना पटोले यांनी यावेळी बोलताना केला. GDP वाढवला म्हणजे Gas, Diesel आणि Petrol यांच्या दरात वाढ केली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असताना केंद्र सरकार इंधनावर भरमसाठ करवाढ करून लूट करत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
दरम्यान, गेल्या वर्षभरापासून देशात सुरू असलेल्या कोरोनाच्या संसर्गाचे संकट अद्याप टळलेले नाही. या वर्षभरात कोरोनामुळे महाराष्ट्रातही बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोनाबळींमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे.