कोल्हापूरमधील दोन मुलांनी औरंगजेबचे स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. धर्माचे ठेकेदार आणि सरकार यांना हे प्रकरण पेटवायाचे असल्याने दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करायचे काम सरकार करतेय. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाल्याची टीका नाना पटोले यांनी केली.
नाना पटोले यांनी राजकारणातील आगामी भूमिकेवरही आपलं मत व्यक्त केलं आहे. नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये नाना पटोले भावी मुख्यमंत्री, अशा आशयाचे बॅनर लागले होते. याबाबत पत्रकारांनी आपल्याला लोकसभेमध्ये जायला आवडेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल? प्रश्न विचारला. यावर हे वेळेवर सांगेन, असं उत्तर नाना पटोले यांनी दिले.