गेल्या काही दिवसांपासून विरोधकांची INDIA आघाडी आणि सत्ताधारी NDAमध्ये मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधारी यांनी जय्यत तयारीला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएमध्ये सहभागी असलेल्या महाराष्ट्रातील खासदारांची बैठक घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांना काँग्रेसमुळे पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही, असं सांगितले.
काँग्रेसमधील घराणेशाहीच्या राजकारणामुळे शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही. तसेच, शरद पवार आणि काँग्रेसने अनेक राजकीय क्षमता असलेल्या नेत्यांना डालवण्यांचे काम केले, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. नरेंद्र मोदींच्या या विधानावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना पंतप्रधान बनवून टाकावे. शरद पवारांची एवढी चिंता असेल तर तुम्ही पंतप्रधान बनवून टाका, असं नाना पटोले म्हणाले.
आम्ही शिवसेनेसोबत युती तोडली नाही तर त्यांनी तोडली. २०१४ पासून शिवसेना युतीत असूनही त्यांचे मुखपत्र सामनातून सरकारवर टीका करत राहिले. आम्ही एकत्रित निवडणूक लढवल्या आणि जिंकल्याही. सत्तेत असतानाही शिवसेना टीका करायची. विनाकारण वाद उकरून काढायची. आम्ही सर्वकाही सहन केले, कमीपणा घेतला, तुम्हाला सत्तेत पण राहायचे आणि टीकाही करायची या दोन्ही एकत्र कशा होऊ शकतात, अशी विचारणा पंतप्रधान मोदी यांनी केली.
जस्थानची निवडणूक जिंकणे महत्वाचे-
राजस्थानमधील कोणत्याही सरकारची स्थिती आता इतकी वाईट नाही. भारताच्या विकासासाठी राजस्थानची निवडणूक जिंकणे आवश्यक आहे. राजस्थानची निवडणूक जिंकणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. मी वैयक्तिकरित्या घराणेशाहीच्या राजकारणाच्या विरोधात असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.