फडणवीसांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही; नाना पटोलेंचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 04:47 PM2021-02-19T16:47:22+5:302021-02-19T16:48:58+5:30
पेट्रोल-डिझेलची दरवाढ, गॅसच्या वाढलेल्या किमती यांवरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे.
मुंबई : पेट्रोल-डिझेलची दरवाढ, गॅसच्या वाढलेल्या किमती यांवरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे. माझे मित्र फडणवीसांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही, असे प्रत्युत्तर नाना पटोले यांनी दिले आहे. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे शूटिंगही बंद पाडू, असा इशारा पटोले यांनी दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला होता. (congress leader nana patole replied bjp leader devendra fadnavis)
''सत्तापक्ष का नेता न हुआ तो क्या हुआ विपक्ष का नेता तो हुआ, याच नकारात्मक भूमिकेतून माझे मित्र देवेंद्र फडणवीस अलीकडे वक्तव्य करीत असतात. त्यामुळे त्यांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही. पेट्रोल आणि गॅस दरवाढी संदर्भात मी जनतेच्या मनातील असंतोषाला वाचा फोडली आहे'', असे ट्विट नाना पटोले यांनी केले आहे.
सत्तापक्ष का नेता ना हुआ तो क्या हुआ विपक्ष का नेता तो हुआ, याच नकारात्मक भूमिकेतुन माझे मित्र देवेंद्र फडणवीस ( @Dev_Fadnavis ) अलिकडे वक्तव्य करीत असतात. त्यांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही. पेट्रोल आणि गॅस दरवाढी संदर्भात मी जनतेच्या मनातील असंतोषाला वाचा फोडली आहे. pic.twitter.com/RpyzyB4WFN
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 19, 2021
भाजप नेत्यांना मिरच्या झोंबण्याचे कारण काय?
एरवी छोट्या-छोट्या गोष्टींवर टीव-टीव करणारे अभिनेते जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर गप्प का? ही जनतेच्या मनातील भावना मी व्यक्त केली तर भाजप नेत्यांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय?, असा प्रश्नही नाना पटोले यांनी यावेळी विचारला आहे.
दरम्यान, काँग्रेस सरकार असताना पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यावर ट्विटवर ट्विट करणारे अभिनेते अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांच्यावर पटोले यांनी जोरदार टीका केली होती. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांना महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला होता. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंवर टीकास्त्र सोडले.
गुन्हेगाराचे वय पाहून कारवाई करायची का; अमित शहा यांचा विरोधकांना सवाल
अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या संदर्भातील वक्तव्य म्हणजे केवळ नाना पटोले यांचा हा पब्लिसिटी स्टंट आहे. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्यावर काही बोलले की, दिवसभर पब्लिसिटी मिळते. शूटिंग कसे आणि कोण बंद करू शकते?, अशी विचारणा करत इथे कायद्याचे राज्य आहे. तुम्ही सत्तारूढ पक्षाचे आहात याचा अर्थ असा नाही की, तुम्ही मालक झालात. म्हणजे बदनाम हुआ तो क्या हुआ नाम तो हुआ, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांना उद्देशून काढला होता.