सावरकर क्रांतिकारक होते, पण...; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 07:56 PM2022-11-24T19:56:55+5:302022-11-24T19:57:29+5:30

वयाच्या २८ व्या वर्षी त्यांना ५० वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. त्यांनी १० वर्ष शिक्षा भोगली. वयाच्या ३८ व्या वर्षापर्यंत ते शिक्षा भोगत होते. कुणालाही कल्पना करता येणार नाही इतकी क्रूर ती शिक्षा होती असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

Congress leader Prithviraj Chavan presented a clear stand over Rahul Gandhi Controversy Statement on Veer Savarkar | सावरकर क्रांतिकारक होते, पण...; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली स्पष्ट भूमिका

सावरकर क्रांतिकारक होते, पण...; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली स्पष्ट भूमिका

googlenewsNext

सातारा - राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील विधानावर भाजपानं राजकारण केले. पुरावे देऊन राहुल गांधींनी विधान केले. तो विषय तिथे संपला. काळ्या पाण्याची शिक्षा हजारोंना झाली होती. काळ्या पाण्याची शिक्षा वाईट होती. ती सावरकरांना झाली होती. सावरकर क्रांतीवीर होते. चांगले लेखक, कवी होते. त्या व्यक्तीचे मूल्यमापन करणारा तुलनात्मक घेतले पाहिजे. राहुल गांधींनी केवळ एक बाजू मांडली. पुरावे दाखवले. त्यावरून वाद निर्माण झाला. ऐतिहासिक पुरुषांकडे पाहताना सर्व दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे अशा शब्दात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी राहुल गांधींच्या विधानावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सावरकरांनी भारताच्या १८५७ च्या युद्धाबद्दल एक भूमिका मांडली होती. ते शिपयांचे बंड नव्हते तर स्वातंत्र्ययुद्ध होते असं पुस्तक लिहिलं होतं. तेव्हा इंग्रजांनी त्यांच्यावर खटला दाखल केला. पॅरिसमधून त्यांना अटक केली. मग त्यांना भारतात आणताना जहाजातून समुद्रात उडी मारली होती. हे खरे आहे. ते क्रांतिकारक होते, लेखक होते. त्यांच्या सगळ्या मतांवर सहमत होऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलं. 

परंतु वयाच्या २८ व्या वर्षी त्यांना ५० वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. त्यांनी १० वर्ष शिक्षा भोगली. वयाच्या ३८ व्या वर्षापर्यंत ते शिक्षा भोगत होते. कुणालाही कल्पना करता येणार नाही इतकी क्रूर ती शिक्षा होती. १० वर्षानंतर त्यांची मानसिकता मोडली. तिथून पुढे दुसरा टप्पा सुरू होतो. आणखी ४० वर्ष जेलमध्ये राहायचं म्हणून त्यांनी मला माफ करा, माझी चूक झाली. मी मदत करेन अशी पत्र लिहिली. ते माफीवीर होते असं राहुल गांधींनी म्हटले ते पुरावे दाखवले असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

दरम्यान, सावरकर हे क्रांतीवीर होते तर माझं मत होते, इंदिरा गांधी यांनी १९६६ साली सावरकरांवर स्टॅम्प काढला होता. देशद्रोही असते तर इंदिरा गांधींना इतिहास माहिती नव्हता का? सावरकर गेले तेव्हाही इंदिरा गांधींनी पत्र लिहिलं होतं. १० वर्ष जेलमध्ये भोगून सावरकरांना ब्रिटीशांनी सोडलं. त्यानंतर ते रत्नागिरीत राहत होते. इंग्रजांकडून मानधन मिळत होते. हिंदू धर्मातील विकृतीवर त्यांनी चांगली भूमिका मांडली. गाय उपयोगी पशु आहे. मांसाहाराचा पुरस्कारही केला. लिखाणात वेगवेगळ्या गोष्टी आहे असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Congress leader Prithviraj Chavan presented a clear stand over Rahul Gandhi Controversy Statement on Veer Savarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.