शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

"…और भक्त कहते हैं भारत इनके हाथ में सुरक्षित है ", सचिन सावंतांचा भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 7:32 PM

Sachin Sawant : जे स्वतःचे ट्विटर अकाऊंट वाचवू शकले नाही ते देशाच्या सीमा कशा सुरक्षित ठेवणार असा खोचक सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपाला केला आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (PM Narendra Modi) ट्विटर अकाऊंट (Twitter Account Hacked ) हे काही वेळासाठी हॅक केल्याचे समोर आले. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत माहिती दिली होती. मात्र, ट्विटर अकाऊंट काही वेळात पुन्हा सुरळीत करण्यात आले. 

दरम्यान, अकाऊंट हॅक केल्यानंतर काही वेळातच हॅकर्सनी क्रिप्टोकरन्सीला प्रोत्साहन देणारे एक ट्विट केले होते. नंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले. मात्र, या ट्विटचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.  

जे स्वतःचे ट्विटर अकाऊंट वाचवू शकले नाही ते देशाच्या सीमा कशा सुरक्षित ठेवणार असा खोचक सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपाला केला आहे. "चौकीदार अपना ट्विटर अकाउंट नहीं बचा सकता, वह देश की सीमा कैसे बचा सकता हैं? और भक्त कहते हैं भारत इनके हाथ में सुरक्षित है।", असे काँग्रेस नेते सचिन सावंत ट्विटद्वारे म्हणाले आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करत यासंबंधी माहिती दिली होती. 'पंतप्रधानांचं ट्विटर हँडल @narendramodi सोबत छे़डछाड करण्यात आली होती. ट्विटरला याची माहिती देण्यात आली असून अकाऊंट तात्काळ पुन्हा सुरक्षित करण्यात आले आहे. छेडछाड करण्यात आलेल्या काळात करण्यात आलेल्या ट्वीटकडे दुर्लक्ष करा,' असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले होते. 

दरम्यान, "भारताने अधिकृतपणे बिटकॉईनला कायदेशीर मान्यता दिली आहे आणि सरकार 500 बीटीसी विकत घेत आहे आणि लोकांमध्ये वितरित करत आहे" असे ट्विट हे अकाऊंट हॅक केल्यानंतर करण्यात आले होते. 

रविवारी साधारण 2 वाजून 11 मिनिटांनी हे ट्विट करण्यात आले होते. आता अकाऊंटवरून हे ट्विट हटवण्यात आले आहे. मात्र, काही युजर्स सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. हे ट्विट हटवले गेले असले तरी काही युजर्सनी त्याचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

टॅग्स :Sachin sawantसचिन सावंतNarendra Modiनरेंद्र मोदीTwitterट्विटर