गांधी-नेहरू या महापुरुषांचा शिवसेनेने अपमान करू नयेत: संजय निरुपम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 12:24 PM2019-12-23T12:24:32+5:302019-12-23T12:25:42+5:30
शिवसेनेची भूमिका म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीत काँग्रेसच्या बहुमूल्य योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी असून हे निषेधार्थ असल्याचे सुद्धा निरुपम म्हणाले आहे.
मुंबई: राज्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेत सत्तास्थापन केली आहे. मात्र वेगवेगळ्या विचारधारा असलेल्या या पक्षांच्या नेत्यांमध्ये आत्तापासूनच आपल्या भूमिकेवरून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. रविवारी सामनामधून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महात्मा गांधी, पंडित नेहरू व वि.दा. सावरकर यांच्याबद्दल लिहलेल्या लेखावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
सामनाच्या 'रोखठोक'मधून आपले मत मांडताना संजय राऊत म्हणाले होते की, महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दलही अनेकदा शंका उपस्थित केल्या गेल्या; पण वीर सावरकर व त्यांच्यासारख्या असंख्य सशस्त्र क्रांतिकारकांच्या वाट्याला ज्या यातना, छळ अंदमानच्या तुरुंगात आला तशा यातना गांधी, नेहरू, बोस, सरदार पटेलांच्या वाट्याला आल्या नसल्याचे राऊत म्हणाले होते.
त्यांच्या या भूमिकेनंतर निरुपम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. "सावरकरांच्या बचावात शिवसेनेला काय भूमिका घ्यायची त्यांनी ती घ्यावी. मात्र स्वातंत्र्य सैनिक महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाष चन्द्र बोस यांचे अपमान करू नयेत" असे ट्वीट करत निरुपम यांनी शिवसेनेवर टीका केली.
शिवसेना सावरकर के बचाव में जो तर्क देना चाहे दे,पर इस प्रयास में गांधी,नेहरू,पटेल,बोस जैसे महान स्वतंत्रता सैनानियों का अपमान न करे।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) December 23, 2019
सामना के कल के लेख में यह टोन दिख रहा है।यह घातक है और स्वतंत्रता आंदोलन में कॉंग्रेस के अतुलनीय योगादन पर प्रश्नचिन्ह खड़ा करता है।
यह निंदनीय है।
तर सामानातून आलेल्या लेखातून स्वातंत्र्य सैनिकांबद्दलची शिवसेनेची भूमिका जाणवत असून त्यांची ही भूमिका घातक आहे. तर शिवसेनेची भूमिका म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीत काँग्रेसच्या बहुमूल्य योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी असून हे निषेधार्थ असल्याचे सुद्धा निरुपम म्हणाले आहे.