मुंबई : कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज गेले कुठे, असा प्रश्न करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मुंबईत निदर्शने केली.नरिमन पॉर्इंट येथील भाजप कार्यालयासमोर निदर्शन करण्याच्या इराद्याने निघालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मंत्रालयाजवळच रोखत ताब्यात घेतले. केंद्र सरकारच्या पॅकेजविरोधातील राज्यव्यापी आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी आज भाजप कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा युवक काँग्रेसने दिला होता. त्यानुसार आंदोलनास निघालेले युवक अध्यक्ष सत्यजीत तांबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 'मोदीजी, कहाँ गये वो २० लाख करोड? या प्रश्नाची भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना भीती का वाटते, असा प्रश्न तांबे यांनी यावेळी केला. या आंदोलनात युवक काँग्रेसने सोशल डिस्टन्सिंंगसह इतर सर्व अटी व नियमांचेही पालन केल्याचा दावा तांबे यांनी केला.
"२० लाख कोटींचे पॅकेज गेले तरी कुठे? मोदींना या प्रश्नाची भीती का वाटते?"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 4:29 AM