मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण आलं आहे. रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. त्यात काही जणांकडून यात मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव गोवण्याचा प्रकार केला आहे. विरोधकांनी ही असा आरोपा केला आहे. महाराष्ट्र युथ काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी याला आता उत्तर दिलं आहे.
'आदित्यजी, चिंता करू नका. सुशांत प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम आहे की बिहार पोलीस हे शेंबडं पोरगंही सांगेल' असा टोला सत्यजित तांबे यांनी विरोधकांना लगावला आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. "आदित्यजी, चिंता करू नका. जनता हुशार आहे. मुंबई पोलीस सक्षम आहे की बिहार पोलीस? हे शेंबडं पोरगंही सांगू शकेल. आपण करत असलेले उत्तम कार्य सहन न होऊ शकणाऱ्यांचे हे गलिच्छ राजकारण आहे" असं सत्यजित तांबे यांनी दिलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील विरोधकांचा समाचार घेतला आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे कोण लोक आहेत, याची माहिती आपल्याकडे आहे याचा लवकरच स्फोट होईल. सुशांतच्या प्रकरणात राजकारण होत आहे. पडद्यामागून पटकथा लिहिली जात आहे. हे राजकारण दळभ्रदी असून प्रतिमा मलीन करण्याचा डाव आहे. ज्यापद्धतीने आदित्य ठाकरेंच्या दिशेने आरोपांच्या फैरी झाडत आहात त्यांनी लक्षात ठेवा, यात बदनाम महाराष्ट्राला करत आहात असं त्यांनी म्हटलं आहे. न्यूज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
तसेच हे संपूर्ण कारस्थान ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी केले जात आहे. महाराष्ट्राविरोधात कोण कारस्थान करत आहे. राजकारण करत आहे, कशापद्धतीने राजकारण होत आहे आणि कोणत्या थराला जाऊन केले जात आहे. याचा लवकरच स्फोट होईल, खुलासा करण्यात येईल असा इशारा खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Breaking: रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट जैसे थे; आरबीआयकडून EMI सवलतीवर सस्पेन्स कायम
CoronaVirus News : काय सांगता? रेनकोट समजून चोरलं पीपीई किट अन् झालं असं काही...
बापरे! कोरोनानंतर चीनमध्ये आणखी एका व्हायरसचा धोका; 7 लोकांचा मृत्यू, 60 जणांना लागण
CoronaVirus News : कोरोनाचा धडकी भरवणारा वेग! जगभरात दर 15 सेकंदाला होतोय एकाचा मृत्यू
धक्कादायक! कोरोनामुळे पतीचा मृत्यू, दु:खी झालेल्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल